लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : ‘जो शिकवी जगाला, धन्य त्याचा जन्म आहे, ज्ञान ज्योती तेवती ठेवा, जिथे अज्ञान’ या उक्तीप्रमाणे चातारी गावातील शैक्षणिक, सामाजिक व परिवर्तनवादी विचाराचा प्रसार सतत चालू आहे. याचाच प्रत्यय ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी आला. जिल्हा शिक्षक पुरस्कारात उमरखेड तालुक्यातील चातारी येथील तीन शिक्षकांना गौरविण्यात आले. त्यामुळे चातारीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.उमरखेड तालुक्यातील चातरी येथील जिल्हा परिषद कन्या शाळेचे शिक्षक रामकिसन भोसले, चातारीचे सुपूत्र सुनील पवार, शरद तोरकर यांना जिल्हा परिषदेने शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. या तिन्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्याबरोबरच उपस्थिती, खेळ, विज्ञान प्रदर्शन, कबबुलबुल, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता विविध स्पर्धांत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांना जिल्हास्तर, विभागस्तरापर्यंत पोहोचविले. शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. या शिक्षकांनी शाळा डिजीटल करण्यासाठी गावकºयांचा सहभाग मिळविला.या तिघांना मिळालेल्या पुरस्काराने चातारीचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. चातारीत शिक्षकांची संख्या मोठी असून, या पुरस्काराने गावाचा लौकीक वाढला आहे. गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, गटशिक्षणाधिकारी खुडे, वाल्मीक इंगोले, शिकारे, दांडेगावकर, वड्डे, ढगे, यमलजवार, कुंभलवाड यांनी त्यांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर, पंचायत समिती सदस्य रक्षा माने व शाळा समितीचे आभार मानले.
चातारीच्या तिघांना जिल्हा शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 21:52 IST
‘जो शिकवी जगाला, धन्य त्याचा जन्म आहे, ज्ञान ज्योती तेवती ठेवा, जिथे अज्ञान’ या उक्तीप्रमाणे चातारी गावातील शैक्षणिक, सामाजिक व परिवर्तनवादी विचाराचा प्रसार सतत चालू आहे.
चातारीच्या तिघांना जिल्हा शिक्षक पुरस्कार
ठळक मुद्देगावाचा गौरव : प्रशासनाने घेतली दखल, गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा