शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव घटनेचे जिल्हाभर पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 21:58 IST

भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी पडसाद उमटले. यवतमाळ शहरानजीक मोहा येथे बसवर आणि पुसद येथे दुकानांवर दगडफेक करण्यात आली.

ठळक मुद्देबसवर दगडफेक : शेंबाळपिंपरीत रस्ता रोको, आर्णी, बोरी येथे बंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी पडसाद उमटले. यवतमाळ शहरानजीक मोहा येथे बसवर आणि पुसद येथे दुकानांवर दगडफेक करण्यात आली. तर पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे रस्ता रोको आणि आर्णी व बोरीअरब येथे बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी भीमा कोरेगाव येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.यवतमाळ शहरानजीक मोहा फाट्यावर यवतमाळ-धामणगाव एसटी बसवर (क्र.एम.एच.१४-बीटी-४९८२) दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. यात बसचे काच फुटले. या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तसेच राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दगडफेकीत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे सकाळी ११ वाजता रस्ता रोको करण्यात आला. नागरिकांनी पुसद-हिंगोली मार्गावर दगड टाकून आणि टायर पेटवून वाहतूक रोखून धरली. तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. पुसद शहरातील डॉ.आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौका दरम्यान दुपारी १२ वाजता काही व्यक्तींनी दुकांनावर दगडफेक केली. शहर पोलिसांनी काही वेळातच तेथे पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुसद येथे रॅली काढण्यात आली. उपविभागिय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले.आर्णी आणि बोरीअरब येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. आर्णी येथील बाजारपेठ बंद होती. घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निवेदन देण्यात आले. बोरीअरब येथील नागरिकांनी कडकडीत बंद पाळून उपविभागीय अधिकाºयांना निवेदन दिले. तर दारव्हा येथे मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय अधिकाºयांना निवेदन दिले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव