लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळविलेली यवतमाळातील काटेबाईची शाळा आज खितपत पडली आहे. या शाळेत विद्यार्थी भरपूर आहेत, पण निम्मे शिक्षकच नाहीत. शाळेतील नळाचे कनेक्शन कापले आहे. विजेचे कनेक्शनही कापण्याची नोटीस मिळाली आहे. यामुळे शाळेसह विद्यार्थ्यांचे भविष्य काळोखमय झाले आहे.१९२८ मध्ये मराठी शाळा यवतमाळात अस्तित्वात आली. ही ब्रिटिशकालीन शाळा आहे. या शाळेतील शिक्षण आणि शिस्त पाहून विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा राहत होती. तत्कालीन काटेबाई नावाच्या मुख्याध्यापिकेच्या नावाने जिल्हा परिषदेची शाळा ओळखली जात होती.अलीकडे या शाळेचे जिल्हा परिषद कन्या शाळा म्हणून नामकरण झाले. या ठिकाणी मराठी आणि उर्दू माध्यमाचे वर्ग चालत होते. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा अधिक असतानाही या शाळेतील विद्यार्थी गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये ‘शिफ्ट’ करण्यात आले.तर आठवी ते बारावीपर्यंत उर्दू माध्यमाच्या १४५ विद्यार्थिनी येथे शिक्षण घेतात. त्यांना शिकविण्यासाठी ७ शिक्षकांची गरज आहे. मात्र गत पाच वर्षापासून केवळ ३ शिक्षकच कार्यरत आहेत. या ठिकाणी शिक्षक मिळावे म्हणून वारंवार निवेदन दिले गेले. मात्र शाळेला आजपर्यंत उर्दू शिक्षक मिळाले नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले.जिल्हा मुख्यालयात विद्यार्थी असतानाही शाळेकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष आहे. आता या शाळेचे नळ कनेक्शनही कापण्यात आले आहे. तर वीज कनेक्शनही कापण्याची नोटीस शाळेला मिळाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी कुठून मिळणार हा प्रश्न आहे. जिल्हास्थळावरील ही दूरवस्था बघता खेड्यापाड्यांची कल्पना येते.शाळेत इंग्रजी, समाजशास्त्र, विज्ञान, गणित विषयाला शिक्षक नाही. यासाठी वरिष्ठांशी वारंवार संवाद साधला. निवेदन दिले. मात्र त्याचा उपयोग नाही. पाच वर्षापासून शिक्षक मिळत नाही. जिल्हा मुख्यालयातील शाळेची ही दुर्दशा आहे.- अब्दुल अन्सारअध्यक्ष, शाळा समितीशाळेत विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे. मात्र या शाळेला शिक्षक मिळत नाही. या शाळेत शिपाई नाही. वारंवार निवेदन देऊनही शिक्षक मिळाले नाही.- साहेबा सुलतानामुख्याध्यापिका, जिल्हा परिषद कन्या शाळा
जिल्हा मुख्यालयाची शाळा खेड्यापेक्षा भयंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST
अलीकडे या शाळेचे जिल्हा परिषद कन्या शाळा म्हणून नामकरण झाले. या ठिकाणी मराठी आणि उर्दू माध्यमाचे वर्ग चालत होते. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा अधिक असतानाही या शाळेतील विद्यार्थी गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये ‘शिफ्ट’ करण्यात आले. तर आठवी ते बारावीपर्यंत उर्दू माध्यमाच्या १४५ विद्यार्थिनी येथे शिक्षण घेतात. त्यांना शिकविण्यासाठी ७ शिक्षकांची गरज आहे.
जिल्हा मुख्यालयाची शाळा खेड्यापेक्षा भयंकर
ठळक मुद्देपाच वर्षांपासून चार शिक्षक नाही : नळ कनेक्शन कापले, वीजपुरवठा तोडण्याचीही नोटीस