शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

जिल्हा सहकारी बँकेची थकबाकी १०४५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 05:00 IST

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ सर्वोच्च न्यायालयाने बरखास्त केले. प्रशासक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर बुधवारी जिल्हाधिकाºयांनी पहिल्यांदाच जिल्हा बँकेत भेट दिली. यावेळी त्यांनी प्रमुख अधिकाºयांची बैठक घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केली. तेव्हा बँकेच्या एकूण थकबाकीचा आकडा एक हजार ४५ कोटी असून त्यातील ६५० कोटी रुपये एनपीए झाल्याची माहिती पुढे आली.

ठळक मुद्दे६५० कोटी बुडित : ‘टॉप दीडशे’ थकबाकीदारांना जिल्हाधिकाऱ्यांची वसुलीसाठी नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एकूण थकबाकी १ हजार ४५ कोटी असून त्यातील ६५० कोटी संभाव्य बुडित (एनपीए) आहे. बँकेच्या टॉप दीडशे थकबाकीदारांना जिल्हा बँकेचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या स्वाक्षरीने नोटीस बजावली जाणार आहे.जिल्हा बँकेचे संचालक मंडळ सर्वोच्च न्यायालयाने बरखास्त केले. प्रशासक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच जिल्हा बँकेत भेट दिली. यावेळी त्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केली. तेव्हा बँकेच्या एकूण थकबाकीचा आकडा एक हजार ४५ कोटी असून त्यातील ६५० कोटी रुपये एनपीए झाल्याची माहिती पुढे आली. बँकिंग नियमानुसार एनपीए जास्तीत जास्त पाच टक्क्याच्या आत असणे बंधनकारक आहे. मात्र बँकेचा एनपीए ४५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. बँकेचा एनपीए कमी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाºयांचे प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून थकबाकीचे मोठे आकडे असलेल्या दीडशे जणांना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने गुरुवारी नोटीस जारी केल्या जाणार आहेत. थकबाकीदारांची जी प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत त्यात निर्णयाची प्रतीक्षा केली जाईल. थकबाकी वसुलीच्या दृष्टीने बँकेत बाजू मांडली जाईल. मात्र जी प्रकरणे केवळ न्यायप्रविष्ठ आहे, त्यात कोणताही आदेश झालेला नाही अशा प्रकरणात थकबाकी वसुलीच्या दृष्टीने प्रशासकाकडून प्रयत्न केले जाणार आहे. थकबाकी वसुली करताना कुणाचाही मुलाहिजा बाळगला जाणार नाही, कुणीही असो कारवाई होणारच असे संकेतही जिल्हाधिकाºयांनी बँकेतील बैठकीत दिले.कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही घेणार आढावाजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. त्यांच्या वेतनावर दीड ते दोन कोटी रुपये खर्च होतात. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची एवढ्या मोठ्या संख्येने खरोखरच गरज आहे का, त्यांचा परफॉर्मन्स-उपयोग काय? याचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँक प्रशासनाला दिले आहेत. गरज नसताना केवळ राजकीय शिफारसींमुळे हे कंत्राटी कर्मचारी कार्यरत तर नाही ना, याची शहानिशा केली जाईल. गरज नसेल तर कंत्राटी कर्मचारी संख्या घटविण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो.जिल्हा बँकेचा एनपीए कसा कमी होईल, यावर भर दिला जात आहे. सध्या टॉप दिडशे थकबाकीदारांना नोटीस जारी केल्या जात असून उर्वरित थकबाकीदारांनाही बँक आपल्या सल्ल्याने नोटीस जारी करणार आहे. अधिकाधिक थकबाकी वसुली करून बँक आर्थिकदृष्ट्या आणखी सुस्थितीत आणण्याचा आपला प्रयत्न आहे.- एम.डी. सिंहप्रशासक (जिल्हाधिकारी), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ.

टॅग्स :bankबँक