शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

जिल्हा बँकेने ६० लाख उधळले

By admin | Updated: January 15, 2016 03:08 IST

खासगी न्यायालयीन लढाईसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिजोरीतून तब्बल ६० लाख रूपयांची उधळपट्टी करण्यात आली.

उच्च न्यायालय : १४ संचालकांच्या फेरचौकशीचे आदेशयवतमाळ : खासगी न्यायालयीन लढाईसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिजोरीतून तब्बल ६० लाख रूपयांची उधळपट्टी करण्यात आली. यातील १४ संचालकांची चौकशी करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश नागपूर उच्च न्यायालयाचे न्या.पी.बी. वराळे यांनी गुरुवारी अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांना दिले.सोबतच सहकार मंत्र्यांच्या आदेशाला आव्हान देणारी जिल्हा बँकेची याचिका खारीज केली. राळेगाव येथील सदाशिव महाजन यांनी हे प्रकरण गेल्या काही वर्षांपासून लावून धरले आहे.जिल्हा सहकारी बँकेचे १४ संचालक ज्या सेवा सहकारी संस्थांमधून बँकेवर प्रतिनिधी म्हणून आले, त्या संस्था थकीत झाल्या होत्या. त्यावर महाजन यांच्या याचिकेवरून तत्कालीन विभागीय सहनिबंधकांनी बँकेच्या १४ संचालकांना अपात्र ठरविले होते. या विषयाच्या अनुषंगाने या संचालकांनी न्यायालयीन लढाई लढली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले. गाडी भाडे, प्रवास खर्च, निवास खर्च, भोजन, वकील फी, कोर्ट फी स्टॅम्प, टायपिंग आदी बाबींवर सुमारे ६० लाख रुपये बँकेच्या (शेतकऱ्यांच्या) तिजोरीतून खर्च केले गेले. १४ संचालकांची अपात्रतेची वैयक्तिक लढाई असताना बँकेच्या तिजोरीवर ६० लाखांचा बोजा कशासाठी असा प्रश्न उपस्थित करून सदाशिव महाजन यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यांचा माहितीचा अर्ज उपनिबंधक व नंतर विभागीय सहनिबंधकांनी खारीज केला. त्याला महाजन यांनी मंत्रालयात आव्हान दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये हे प्रकरण प्रलंबित ठेवण्यात संचालकांनी यश मिळविले होते. मात्र राज्यात भाजपा-सेना युती सरकार स्थापन होताच या प्रलंबित प्रकरणाला गती मिळाली. सहकार व पणन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ६० लाखांच्या या उधळपट्टीची फेरचौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नागपूर उच्च न्यायालयात आव्हान दिले. शिवाय कॅव्हेटही दाखल केला होता. त्यावर याचिकाकर्ता सदाशिव महाजन यांच्यावतीने अ‍ॅड. सुभाष पालीवाल (भंडारा) यांनी युक्तीवाद केला. १४ संचालकांचे वैयक्तिक प्रकरण असताना बँकेच्या तिजोरीतून खर्च कशासाठी ? हा वाद सुरू असतानाच बँकेने मंत्र्यांच्या आदेशाला तिजोरीतील खर्चाने आव्हान दिले कसे, या खर्चाची भरपाई कुणाकडून करायची आदी मुद्दे उपस्थित केले गेले. अखेर न्या.वराळे यांनी बँकेची मंत्र्यांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. सोबतच १४ संचालकांनी बँकेच्या तिजोरीतून केलेल्या ६० लाखांच्या खर्चाची अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी नव्याने चौकशी करावी, संचालकांना आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी द्यावी आणि दोन आठवड्यात अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. (जिल्हा प्रतिनिधी) संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवारजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची गेल्या तीन वर्षांपासून लांबलेली संचालक मंडळाची निवडणूक आता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. निवडणुका तोंडावर असताना अचानक न्यायालयाने ६० लाखांच्या खर्चाच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत दोषी आढळल्यास हे सर्व १४ संचालक बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी अपात्र ठरणार आहे. त्यांना अपात्र ठरविण्यासाठी भाजपा-सेनेकडून जोर लावला जाण्याची शक्यता आहे. त्यांना अपात्र करून बँकेत ‘एन्ट्री’ मिळविण्याचा युतीच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न होऊ शकतो.