शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

काही पोलिसांच्या दंडुकेशाहीविरूद्ध असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST

विचारपूस न करता थेट दंडुके लावण्याचा प्रकार अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. सोशल मीडियावर एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क पोलिसराज सुरू असल्याची धमकीच ग्रुप चर्चेदरम्यान दिली आहे. तुम्ही आता पुन्हा दिसा, अशा शब्दात या कर्मचाऱ्याने दरडावले आहे. दत्त चौकातून ब्लड बँक कर्मचारी रक्ताची पिशवी घेऊन जात असताना त्याला विचारपूस न करता पहिले चोपण्यात आले. हा प्रकार माणुसकीला शोभणारा नाही.

ठळक मुद्देसोशल मीडियात चक्क ‘पोलीसराज’ची धमकी : ‘त्या’ कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रशासनाच्या आवाहनाला जनमानसातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशा स्थितीत काही महाभाग गालबोट लावण्याचे काम करत आहे. यवतमाळ शहरात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी दंडुकेशाही सुरू केली आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना फटकारले तरी कोणाचाच आक्षेप नाही. मात्र विचारपूस न करता थेट दंडुके लावण्याचा प्रकार अनेकांच्या जिव्हारी लागला आहे.सोशल मीडियावर एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क पोलिसराज सुरू असल्याची धमकीच ग्रुप चर्चेदरम्यान दिली आहे. तुम्ही आता पुन्हा दिसा, अशा शब्दात या कर्मचाऱ्याने दरडावले आहे. दत्त चौकातून ब्लड बँक कर्मचारी रक्ताची पिशवी घेऊन जात असताना त्याला विचारपूस न करता पहिले चोपण्यात आले. हा प्रकार माणुसकीला शोभणारा नाही. औषधी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तीला दंड ठोकला. जयविजय चौकात नगरपरिषद कर्मचाºयाला कर्तव्यावर जात असतानाच मारहाण केली. अशा एकापाठोपाठ अनेक घटना घडत आहेत. रूग्णालयातून सुटी झालेल्या भावाला गावी परत नेण्यासाठी आलेल्या जवळा (ता. आर्णी) येथील युवकाच्या वाहनाला आर्णी रोडवरील वडगाव येथे कारण आणि ओळख सांगूनही बळजबरीने चालान देण्यात आले.गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांचा हा सपाटा सुरू आहे. गुरूवारी कळंब चौक परिसरातील एका पथकाने बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांचा जमाव बाहेर पडला. तातडीने अतिरिक्त कुमक पोहोचल्याने प्रकरण निवळले. घरात राहून सर्वच नागरिक पोलिसांना सहकार्य करत आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी, औषधी खरेदीसाठी घराबाहेर पडत आहे. अशांनाही योग्य विचारपूस करूनच पोलिसांनी पुढे जाऊ द्यायला पाहिजे. बहुतांश पोलिसांकडून याच पद्धतीने कामकाज सुरू आहे. मात्र काही आतताईपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दंडुकेशाहीचा अवलंब केला आहे. कोणतीही विचारपूस न करता थेट मारहाण केली जाते. हा प्रकार वेळीच नियंत्रणात न आल्यास बंदविरूद्ध जनक्षोभ उसळण्याची भीती आहे. पोलिसराजची धमकी देणाऱ्या त्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांकडे दुर्लक्षसंचारबंदी ही एक-दोन दिवसांसाठी लागू नाही. १४ एप्रिलपर्यंत किमान २१ दिवस नागरिकांना घरातच राहावे लागणार आहे. अनेकांचा रोजगार यामुळे बुडाला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मात्र या सर्व परिस्थितीतही यवतमाळ जिल्ह्यातील जनता प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करत आहे. कधी नव्हे अशा स्वरूपाचा बंद सर्वचजण अनुभवत आहे. अशा स्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांनाही आवर घालणे आवश्यक आहे. त्यांनी जबाबदारीचे भान ठेऊन घराबाहेर पडलेल्या व्यक्तीची योग्य चौकशी करूनच त्याला पुढे जाऊ द्यायचे की नाही हे ठरवावे. काहींसाठी आर्थिक दंड, लाठी व इतरही शिक्षा होऊ शकतात, याचा वापर करताना समोरचा व्यक्ती काय सांगतो हे दोन शब्द ऐकून घ्यावे, अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी, पोलिसातील वरिष्ठ अधिकारीही कर्मचाºयांना संयम राखण्याचे निर्देश देत आहेत. मात्र काही पोलीस आपला मनमानी कारभार हाकण्याचा प्रयत्न करत आहे, असे शहरात घडलेल्या दोन दिवसातील घटनांवरून स्पष्ट होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस