शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

जमावाकडून वाहनांची तोडफोड

By admin | Updated: June 28, 2017 00:21 IST

समाजाच्या भावना दुखावणारा मॅसेज सोशल मीडियावर टाकल्याने उमरखेड शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

उमरखेडमध्ये तणाव : व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजने भावना दुखावल्याचा परिणाम लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : समाजाच्या भावना दुखावणारा मॅसेज सोशल मीडियावर टाकल्याने उमरखेड शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. जमावाने वाहनांची तोडफोड केल्याने परिस्थिती गंभीर झाली. यामुळे पोलिसांची जादा कुमक बोलविण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी केले आहे. सोशल मीडियावर (व्हॉट्सअ‍ॅप) टाकलेल्या आक्षेपार्ह मजकुरासंदर्भात सोमवारी रात्री उशिरा पोलिसात तक्रार देण्यात आली. या आधारे मजकुर टाकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. यात मुद्रांक विक्रेता सारनाथ रोकडे आणि नागापूर-रुपाळाचे पोलीस पाटील सदानंद तोडसे यांचा समावेश आहे. या कारवाईनंतर काही लोकांनी मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ढाणकी रोडवर एमएच २६ एके ५८६४ या क्रमांकाच्या स्कॉर्पिओची तोडफोड केली. सदर वाहन उलटून देण्यात आले. दुसरी घटना हुतात्मा चौकातील स्वामी मठाजवळ घडली. याठिकाणी उभी असलेली ह्युंडाई (एमएच २९ एआर ४१९७) सह एका मोटरसायकलची तोडफोड केली. यानंतर जमावाने एका घराला आपले लक्ष्य केले. दगडफेकीत एक व्यक्ती जमखी झाला. या घटनांमुळे शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, तहसीलदार भगवान कांबळे हे परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होते. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव उमरखेडमध्ये दाखल झाले असून त्यांनी स्थितीचा आढावा घेतला. ते येथे तळ ठोकून आहेत. अफवांवर कुणीही विश्वास ठेऊन नये असे आवाहन अमरसिंह जाधव यांनी केले आहे. दरम्यान, दराटी, बिटरगाव, महागाव, पुसद, पोफाळी, वसंतनगर येथून पोलीस कुमक मागविण्यात आली. २० दिवसांपूर्वीचा मॅसेज -अजय बन्सल या प्रकरणी पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल (आयपीएस) यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, समाज भावना दुखविणारा हा मॅसेज २० दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्यात आला होता. त्यावरून यवतमाळ येथील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली होती. तोच मॅसेज सोमवारी पोलीस पाटील सदानंद तोडसे व मुद्रांक विक्रेता सारनाथ रोकडे यांनी उमरखेड शहरातील अनेक ग्रृपवर टाकला. त्यामुळे तोडफोड आणि दगडफेकीची घटना घडली. याची गंभीर दखल घेत सखोल चौकशी सुरू आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, शांतता राखावी असे आवाहन अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.