शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
2
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
3
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
4
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
5
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
6
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
7
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
8
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
9
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
10
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
11
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
12
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
13
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
14
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
15
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
16
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
17
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
18
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
19
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
20
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

आठ नगरसेवकांविरोधात अपात्रतेचा खटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 10:10 PM

जिल्ह्यातील दहा नगरपरिषद व सहा नगरपंचायतींध्ये अंतर्गत हेव्यादाव्यातून थेट आठ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यासाठी अनहर्ता कायदातील तरतूदींचा आधार घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी : झरी, दिग्रस, दारव्ह्यातील प्रत्येकी दोन प्रकरणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील दहा नगरपरिषद व सहा नगरपंचायतींध्ये अंतर्गत हेव्यादाव्यातून थेट आठ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यासाठी अनहर्ता कायदातील तरतूदींचा आधार घेण्यात आला आहे. प्रकरणांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू आहेत.विविध नगरपरिषद व नगरपंचायतीत सुरू असलेल्या कारभार विरोधातही कलम ३०८ अंतर्गत याचिका करण्यात आल्या आहेत. एकूण १६ प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुरू आहेत. यामध्ये नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ४४ अन्वये सदस्यत्व रद्द करण्याच्याच याचिका सर्वाधिक आठ आहेत. झरी नगरपंचायतीचे विलास मारोती डोहे, प्रवीण लेनगुरे, ज्योती संजय बिजगुनवार यांच्या विरोधात २२ मार्च २०१६ रोजी याचिका करण्यात आली. दिग्रस नगरपरिषदेचे सदस्य सुभाष परसराम साबू, विजयकुमार बंग, दारव्हा येथील नगरसेवक दामोधर नगरसिंगदास लढ्ढा, शुभम रामदास गवई, खान फिरदोस मुसब्बील खान यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. उमरखेड येथील मुजीवर रहेमान अब्दूल रहेमान यांच्यावर अपत्रतेची कारवाई करण्याची याचिका दाखल केली आहे. यातील झरी वगळता सर्व नगरपरिषदांचे प्रकरणे २०१७ मधील आहेत. यात जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी सुरू आहे.या व्यतिरिक्त आठ नगरपरिषदांतील विविध स्वरूपाच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आले आहेत. यातील मजेशीरबाब म्हणजे अनेक याचिकाकर्ते हे सत्ताधारीच नव्हेत खुद्द नगरपरिषदेत पदाधिकारी आहेत. त्यानंतरही त्यांच्याकडून ३०८ कलमा अंतर्गत याचिका करण्यात आली आहे. ज्या नगरपरिषदेतून सर्वाधिक याचिका तेथे अंतर्गत अनागोंदी अधिक असे परिमाण ठरले आहे.हितसंबंधातून चुकीच्या आधारावर याचिकायवतमाळ नगरपरिषदेने एक वर्षांचा कालावधी पूर्ण होऊन अद्यापपर्यंत शहरातील घनकचऱ्याच्या कंत्राटाची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. याच पध्दतीने विविध कामांचा निविदा केवळ पालिका प्रशासनातील हितसंबधामुळे चुकीच्या पद्धतीने राबविले जाते. याच चुकांचा आधार घेऊन याचिका दाखल होतात. जाणीवपूर्वक केलेल्या चुकीच्या प्रक्रियेसाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेतील कमिशनखोरी कमी होऊन याचिका दाखल करण्याचे प्रमाण कमी होईल.अंतर्गत वाद शिगेलाजिल्ह्यात बहुतांश नगरपरिषदांमध्ये भाजपा किंवा युतीची सत्ता आहे. त्यानंतरही स्थानिक नेत्यांना हा वाद पालिकास्तरावर निकाली काढण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होते. अंतर्गत वादावादीतूनच केंद्र व राज्यशासनाचा निधी कधीच वेळेत खर्च होत नाही. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.