शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शिक्षकांच्या आपसी बदल्यांवर पुन्हा चर्चा

By admin | Updated: June 2, 2015 00:23 IST

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आपसी बदल्यांवरून चांगलेच रणकंदन सुरू होते.

दीर्घ संघर्ष : सघटनांचे नियमावर बोट, सामान्य प्रशासन विभागातून दोनदा परतले फाईलयवतमाळ : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आपसी बदल्यांवरून चांगलेच रणकंदन सुरू होते. शिक्षक संघटनांनी या बदल्या ‘प्रेस्टीज इश्यू’ केल्याने प्रशासनासोबत सातत्याने खटके उडत होते. २०११-२०१२ पासूनच्या बदल्यांची प्रक्रिया खोळंबली होती. अखेर संघटनांनी नियमावर बोट ठेवल्याने प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले. शिक्षण विभागाच्या बदल्या ह्या सर्वांच्याच ‘इंटरेस्ट’चा विषय आहे. याकडे सर्वांचेच बारीक लक्ष असते. प्रशासनानेही नको तेवढा कायद्याचा किस या बदली प्रक्रियेसाठी पाडला. त्यामुळे सातत्याने संघर्ष सुरू होता. ग्रामविकास मंत्रालयाकडून आदेशानंतरही आपसी बदलीचे फाईल जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून परत आले. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकाही घेतल्या. त्यानंतर सीईओंनी अशा संयुक्त बैठका घेतल्या. आपसी बदलीवरून एकंदर अनेक बैठकांच्या फैरी झडल्या. त्यातूनही काहीच निष्पन्न झाले नाही. काही संघटनेच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देऊन ही प्रक्रियाच करता येणार नाही, अशी मागणी प्रशासनाकडे केली. त्यानंतर पुन्हा आपसी बदलीच्या निर्णयावर प्रशासनाने युटर्न घेतला. शिक्षक संघटनानी पुन्हा दबाव तंत्राचा वापर करत आपले म्हणणे कसे बरोबर आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्या तालुका पदाधिकाऱ्यांची थेट संघटनेतूच हकालपट्टी करण्यात आली. सोमवारी दिवसभर आपसी बदल्यांसाठी संघटनेचे पदाधिकारी सीईओ आणि अध्यक्षांच्या कक्षापुढे ठिय्या देऊन होते. उशीरा पर्यंत आपसी बदल्यांबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालाच नाही. (कार्यालय प्रतिनिधी )