शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वसाहतीतील घाण पाणी निर्गुडा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:44 IST

शहराची वणी शहराला नव्या नळयोजनेद्वारे वर्धा नदीतून पाणी पुरवठा सुरू होताच, वणीची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीची अवस्था वाळीत टाकल्यागत झाली आहे. गरज संपताच, पालिकेने नदीला दुर्लक्षित केल्यामुळे नदीचे पात्र गटारगंगा बनले आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यात : पात्राची झाली गटारगंगा, पालिकेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहराची वणी शहराला नव्या नळयोजनेद्वारे वर्धा नदीतून पाणी पुरवठा सुरू होताच, वणीची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीची अवस्था वाळीत टाकल्यागत झाली आहे. गरज संपताच, पालिकेने नदीला दुर्लक्षित केल्यामुळे नदीचे पात्र गटारगंगा बनले आहे. या नदीत चक्क नागरी वसाहतीतील अतिशय घाण पाणी सोडले जात असल्याने पात्र दूषित झाले आहे.गरजेनुसार आजही काही प्रमाणात शहरात वितरण करण्यासाठी या नदीचे पाणी घेतले जात आहे. नदीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांत गंभीर आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथे पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. मात्र या केंद्रात खरोखरच पाण्याचे शुद्धीकरण होते काय, हा संशोधनाचा विषय आहे. शहरातील दामले फैलभागातून नालिद्वारे मोठ्या प्रमाणावर घाण पाणी नदीत सोडले जात आहे. १५ दिवसांपासून नवरगाव धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले होते. परंतु आता नदीची जलपातळी घटल्याने पात्राची स्थिती विदारक झाली आहे. वणी शहरवासियांची तहान निर्गुडा नदीवरच निर्भर असताना, सन २०१६ मध्ये वेकोलिच्यावतीने यंत्राद्वारे नदी पात्रात सफाई अभियान राबविण्यात आले होते. परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. पुढे नदीच्या उद्धारासाठी निर्मल निर्गुडा मिशन राबविण्यात आले. लोकसहभागातून नदी स्वच्छ करण्यासाठी नगरपालिकेच्या पुढाकारात विविध संघटना व राजकीय पुढारी पुढे आलेत. यातून नदीचे पात्र मोठे करण्यात आले खरे, पण ज्या खडकामुळे नदी स्वच्छ रहायची, तो घाटच उद्ध्वस्त करण्यात आला. या मोहिमेवर २० लाख ४० हजार रुपयांचा खर्च झाला. उर्वरित कामे शासनाकडूनही केल्या जाणार असल्याच्या अफवा त्यावेळी पसरविण्यात आल्या. मात्र तसे काहीही घडले नाही. परिणामी नदीची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, नदी पार करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नदी पात्रात दुतर्फा प्रचंड घाण साचली आहे. विसर्जनानिमित्त बांधण्यात आलेला तात्पुरत्या बांधाचा मलबा अद्यापही नदीत पडून आहे. ते काढण्याचा विसर पालिकेला पडला आहे.वाळूची खुलेआम चोरीयंदा पावसाळ्यात निर्गुडा नदीला दोनवेळा मोठे पूर आलेत. त्यामुळे नदीत वाळूदेखील मोठ्या प्रमाणावर आली. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून गणेशपूर पुलाच्या दोन्ही बाजुच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर खुलेआम वाळूची चोरी केली जात आहे. तीन चाकी गाडीतून ही रेती नेली जात आहे. महसूल विभाग मात्र अद्यापही या विषयात अनभिज्ञ आहे.

टॅग्स :riverनदीwater pollutionजल प्रदूषण