शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
7
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
8
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
9
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
10
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
11
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
12
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
13
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
14
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
15
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
16
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
17
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
18
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
19
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
20
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी

शिवसेनेतील पक्षांतरासाठी थेट ‘मातोश्री’ कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 06:00 IST

आजच्या घडीला विदर्भात शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अनेक जण इन्टरेस्टेड आहेत. कुणी पत्ते ओपन केले तर कुणी अजून ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’च्या स्थितीत आहे एवढेच. परंतु हे पक्षांतर करीत असताना शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला टेकओव्हर केले जात आहे.

ठळक मुद्देस्थानिक नेतृत्व अंधारात : सेना नेत-पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, गुरुवारी आला सलग तिसरा अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी स्थानिक नेतृत्वाला अंधारात ठेऊन थेट ‘मातोश्री’वर संपर्क साधला जात आहे. त्यामुळे पक्षाचे स्थानिक नेतृत्व नाराज आहे. गुरुवारी सलग तिसऱ्यांदा या नेतृत्वाला अशा प्रकाराला सामोरे जावे लागले.विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत आहे. कुठे ईनकमिंग तर कुठे आऊट गोर्इंग सुरू आहे. सध्यातरी या पक्षांतराचा सर्वाधिक जोर विदर्भाबाहेर आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र, मुंबईत या पक्षांतराची लाटच आल्याचे दिसते. विदर्भात पक्षांतराची बोटावर मोजण्याएवढी उदाहरणे आहेत. परंंतु प्रत्यक्ष उमेदवार जाहीर झाल्यानंतर मात्र विदर्भातही पक्षांतराची ही लाट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आजच्या घडीला विदर्भात शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अनेक जण इन्टरेस्टेड आहेत. कुणी पत्ते ओपन केले तर कुणी अजून ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’च्या स्थितीत आहे एवढेच. परंतु हे पक्षांतर करीत असताना शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला टेकओव्हर केले जात आहे. बहुतांश पक्षप्रवेश त्या-त्या जिल्ह्यातील पक्षाच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन केले जातात. मात्र शिवसेनेसाठी यवतमाळ जिल्हा अपवाद ठरला की काय? असे वाटू लागले आहे. सलग दोन-तीन वेळा सेना नेतृत्वाला याचा अनुभव आल्याने स्वत: नेतृत्व व त्यांच्या कायम अवतीभोवती वावरणाºया समर्थकांमध्येसुद्धा नाराजी पहायला मिळते.जिल्ह्यात पुसदमधील नाईक कुटुंबातील सदस्यांचा शिवसेना प्रवेश होऊ घातला होता. मात्र या प्रवेशाचा गाजावाजा होईपर्यंत स्थानिक नेतृत्वाला कल्पना नव्हती, असे सांगितले जाते. राष्ट्रवादीतून दबाव वाढल्यामुळे नाईकांचा हा सेना प्रवेश होता-होता थांबला असला तरी युतीचा निर्णय झाल्यानंतर पुन्हा हा पक्षांतराचा विषय चर्चेला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.पुसद नंतर पांंढरकवडामध्येही असाच प्रकार घडला. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी यवतमाळात पत्रपरिषद घेऊन भाजपकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. त्यानंतर दुसºयाच दिवशी थेट ते ‘मातोश्री’वर पोहोचले आणि शिवबंधनात अडकले. ते शिवसेनेत प्रवेश करेपर्यंत सेनेच्या स्थानिक नेतृत्वाला याची कल्पना नव्हती. पुसद व पांढरकवड्याच्या या पक्षांतराची शिवसेनेत चर्चा सुरू असतानाच गुरुवारी त्याची आणखी एकदा पुनरावृत्ती झाली.काँग्रेसचे एक नेते वाशिम जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. सध्या तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. मात्र तेथे पराभव होत असल्याने व राष्ट्रवादीकडे तेवढे प्रभावी नेतृत्व नसल्याने हा मतदारसंघ काँग्रेसने मागितला असून त्या बदल्यात अमरावती मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याबाबत वाटाघाटी सुरू आहे. मतदारसंघाची ही अदलाबदल आणि त्यात यश आल्यास काँग्रेसच्या त्या नियोजित नेत्याला विधानसभेची उमेदवारी ठरली असताना शिवसेनेत व सोशल मिडियावर अचानक त्या नेत्याच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली.एकूणच परस्पर होणाºया या पक्षांतराबाबत शिवसेनेच्या स्थानिक नेते व पदाधिकाºयांमध्ये बरीच नाराजी व अस्वस्थतासुद्धा पहायला मिळते.‘मातोश्री’वरून फोन खनखनला अन् संभाव्य पक्षांतराचे बिंग फुटलेगुरुवारी दुपारी थेट ‘मातोश्री’वरून शिवसेनेच्या येथील नेतृत्वाला फोन आला, काँग्रेसच्या त्या नेत्याबाबत विचारणा केली गेली. नंतर या नेतृत्वाने त्या काँग्रेस नेत्याला संपर्कही केला. मात्र थेट श्रेष्ठींनी काँग्रेसच्या त्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत अचानक विचारणा केल्याने सेनेचे स्थानिक नेतृत्व पुन्हा अस्वस्थ झाले. सलग तिसºयांदा त्यांना या प्रकाराचा सामना करावा लागला. सेनेत प्रवेश करू इच्छिणाºयांनी स्थानिक पातळीवर कोणतीही चर्चा न करता थेट ‘मातोश्री’वर संपर्क साधल्याने हे नेतृत्व अस्वस्थ झाल्याचे सांगितले जाते. त्यातूनच या नेतृत्वाची व समर्थकांची नाराजीही झाली.परस्पर पक्षांतरामागील नेमके रहस्य काय?स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेता थेट ‘मातोश्री’वर जाऊन शिवबंधनात अडकण्याच्या या प्रकारामागील नेमके रहस्य गुलदस्त्यात आहे. स्थानिक नेतृत्वावर पक्षांतर करू इच्छिणाऱ्यांचा विश्वास नाही, ते अडथळा आणण्याची भीती आहे, स्थानिक नेतृत्वाची तेवढी गरज पक्षांतर करू इच्छिणाऱ्या वाटत नाही की सेनेतीलच जिल्ह्याशी कनेक्टेड दुसरे नेतृत्व या पक्षांतरासाठी मध्यस्थी-मदत करीत आहेत? आदी प्रश्न सेनेच्या गोटातच उपस्थित केले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेना