शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसचे धरण ठरतेय मृत्यूचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST

नांदगव्हाण व अरुणावती धरणामुळे तालुक्यातील जमीन काही प्रमाणात सिंचनाखाली आली. हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जातात. मात्र धरणावर सुरक्षेबाबत कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. पिकनिकसाठी आलेले नागरिक व तरुण पोहण्यासाठी धरणात उडी मारतात. यातच आतापर्यंत काहींचा जीव गेला आहे. या दोन्ही धरणाच्या पाण्यावर शेती सुजलाम् सुफलाम् होत आहे. सोबतच शहराला पाणीपुरवठा होत आहे. मात्र आता हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉटऐवजी मृत्यू केंद्र ठरत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनांदगव्हाण, अरुणावती : सुरक्षा यंत्रणा नाही, आतापर्यंत अनेकांचे गेले बळी

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेले नांदगव्हाण व अरुणावती धरण मृत्यूचे केंद्र ठरत आहे. गेल्या काही दिवसात या धरणात पडून अनेकांचे बळी गेले आहे.नांदगव्हाण व अरुणावती धरणामुळे तालुक्यातील जमीन काही प्रमाणात सिंचनाखाली आली. हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जातात. मात्र धरणावर सुरक्षेबाबत कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. पिकनिकसाठी आलेले नागरिक व तरुण पोहण्यासाठी धरणात उडी मारतात. यातच आतापर्यंत काहींचा जीव गेला आहे. या दोन्ही धरणाच्या पाण्यावर शेती सुजलाम् सुफलाम् होत आहे. सोबतच शहराला पाणीपुरवठा होत आहे. मात्र आता हे दोन्ही ठिकाण पिकनिक स्पॉटऐवजी मृत्यू केंद्र ठरत असल्याचे दिसून येत आहे.धरणावर संबंधित विभागाने कोणतीच सुरक्षा व्यवस्था उभारली नाही. यावर्षी पावसामुळे नांदगव्हाण धरण ओव्हरफ्लो झाले. अरुणावती धरणही ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे. धरणाचे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी अनेकजण भेटी देतात. मात्र त्यापैकी काही जण घरी परत पोहोचू शकत नाही. आतापर्यंत स्टंटबाजीच्या नादात काहींचा जीव गेला. तरीही सुरक्षात्मक पावले उचलण्यात आली नाही.प्रेमी युगुलांसाठी नंदनवननांदगव्हाण व अरुणावती धरणाचे ठिकाण म्हणजे प्रेमी युगुलांसाठी नंदनवन ठरत आहे. त्यांची नेहमी या परिसरात रेलचेल असते. त्यातूनही अनेक अघटित घटना घडतात. त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी किमान प्रवेशद्वारावर सुरक्षा यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे. दोन्ही धरणांवर लहान मुलेसुद्धा मोठ्या प्रमाणात येतात. त्यातूनही अनर्थ घडण्याची शक्यता असल्याने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :dam tourismधरण पर्यटनIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प