लोकमत न्यूज नेटवर्कगुंज : श्रावण महिन्यानिमित्त गावालगतच्या जंगलात असलेल्या महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलांवर मधमाशांनी हल्ला केला. ही घटना महागाव तालुक्यातील माळेगाव येथे मंगळवारी घडली. यात एक महिला ठार झाली तर २० महिला व मुले गंभीर जखमी झाली.पुष्पा गजानन मदने (३२) रा. माळकिन्ही असे मृत महिलेचे नाव आहे. तर सुमित्रा अमोल मदने, सुशीला शिवाजी मदने या जखमी महिलांवर पुसदच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. माळेगाव ते माळकिन्हीदरम्यान शिप नदीच्या तिरावर महादेवाची पिंड आहे. तेथे माळकिन्ही येथील १५ ते २० महिला मुलाबाळासह दर्शनासाठी गेल्या होत्या. महिला पूजाअर्चा करीत असताना अंजन वृक्षावरील आग्यामोहळ अचानक उठले. मधमाशांनी या महिलांवर हल्ला चढविला. त्या मदने परिवरातील तीन महिला गंभीर जखमी झाल्या. तसेच इतर महिलाही जमखी झाल्या. जमखींना पुसदच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी दुपारी पुष्पा मदने यांचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, तीन मुली आहेत.
मधमाशांच्या हल्ल्यात भाविक महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 21:50 IST
श्रावण महिन्यानिमित्त गावालगतच्या जंगलात असलेल्या महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलांवर मधमाशांनी हल्ला केला.
मधमाशांच्या हल्ल्यात भाविक महिला ठार
ठळक मुद्देमाळेगावची घटना : २० महिला जखमी