शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सूक्ष्मनियोजन आराखड्यातून विकास

By admin | Updated: January 20, 2015 22:43 IST

प्रत्येक गावात लोकसहभाग व ग्रामसभेच्या मान्यतेने तयार झालेल्या सूक्ष्मनियोजन आराखड्याच्या आधारे जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मुकेश इंगोले - दारव्हाप्रत्येक गावात लोकसहभाग व ग्रामसभेच्या मान्यतेने तयार झालेल्या सूक्ष्मनियोजन आराखड्याच्या आधारे जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एकात्मिक नियोजनाद्वारे स्थानिक गरजांना अनुसरून विविध योजनांच्या समन्वयाद्वारे गतीमान व समतोल विकास साधण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात नियोजन समितीचे गठन करण्यात आले आहे. नियोजनाची ही लोकाभिमुख कार्यपद्धती अधिक विकसित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.विशेष असे की, संपूर्ण राज्यात राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात दारव्हा तालुक्यातून होत आहे. मुंगसाजी महाराजांची पावन भूमी असलेल्या धामणगाव (देव) या गावी उद्या बुधवारला जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यात सदर निर्णय अंमलात आणला जाईल. पुढच्या टप्प्यात राज्यात उर्वरित जिल्ह्यात हा कार्यक्रम हाती घेण्यात येईल.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास तसेच नियोजन विभागाच्यावतीने यशदा संस्थेच्या मदतीने राज्यातील सहा महसुली विभागातील प्रत्येकी एका मागास तालुक्यात लोकसहभागावर आधारित ग्राम सूक्ष्म नियोजनाद्वारे एकात्मिक ग्रामपंचायत आराखडे तयार करण्याचा एक पथदर्शी प्रकल्प नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. पथदर्शी प्रकल्पाच्या अनुभवच्या आधारे येथून पुढे सूक्ष्म नियोजन पद्धतीने जिल्हा आराखडे तयार करण्यात येणार आहे. ग्रामपंचातय स्तरावरील सूक्ष्म नियोजन सतत सहा दिवस चालेल. या प्रक्रियेमध्ये लोकसहभागाची विविध मनोरंजक तंत्रे जसे मशालफेरी, शिवार फेरी, संसाधन नकाशा, सामाजिक नकाशा, ऋतूचक्राचे विश्लेषण इत्यादीद्वारे गावातील विकासाचे प्रश्न, समस्या यावर सर्वांच्या सहभागातून चर्चा करण्यात येईल. कुटुंब सर्वेक्षणाद्वारे प्रत्येक घरातील स्थिती व समस्या जाणून घेणे, गावातील वाडी, वस्ती, शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र इत्यादींना भेटी देवून प्रत्येक क्षेत्रातील पायाभूत सेवा-सुविधा व त्रुटी, कमतरता याची गाव पातळीवरील नियोजन प्रपत्रामध्ये नोंद करण्यात येईल.अशाप्रकारे सतत चार दिवस लोकसहभागातून गावामध्ये चर्चा, माहिती संकलन इत्यादी झाल्यानंतर पाचव्या दिवशी वार्डनिहाय सभा त्यानंतर महिला ग्रामसभा होईल व शेवटच्या दिवशी ग्रामसभा घेवून सर्व माहिती, समस्या, प्रस्तावित उपाययोजना यावर सांगोपांग चर्चा होईल. उपरोक्त प्रक्रियेच्या आधारे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुढील १५ वर्षे कालावधीतील विकासाचा दृष्टिक्षेप, विविध शासकीय योजनांखाली घ्यावयाची कामे निधी याचा विकास आराखडा व त्याचबरोबर गावपातळीवर लोकसहभागातून स्वयंस्फूर्तीने करावयाच्या कार्यक्रमांचा गाव कृती आराखडा संमत करण्यात येईल. सूक्ष्मनियोजनाच्या आरंभी ग्रामसंसाधन गट तयार करण्यात येईल, या गटामध्ये ग्रामपंचायत सदस्य, शासकीय कर्मचारी, बचत गटाचे सदस्य, युवक मंडळाचे सदस्य व इतर इच्छुक ग्रामस्थांचा समावेश राहणार आहे व गटाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरील सूक्ष्म नियोजन पूर्ण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात राज्यातील बारा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात असणाऱ्या धामणगाव (देव) येथून होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यासह लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजीव शिंदे त्यांचे कर्मचारी धामणगावचे सरपंच जगदीश जाधव व गावातील नगारिक परिश्रम घेत आहे.