शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

खरीपपूर्व माती परीक्षण कार्यक्रमाचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:13 IST

शेतीचे हेल्थकार्ड तयार करण्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. लागवड खर्च वाढत असल्याने तो कमी करण्यासाठी माती परीक्षणावर भर दिला जात आहे.

ठळक मुद्देकृषी यंत्रणा उदासीन : शेतकऱ्यांना योजनेची माहितीच नाही

राजू राठोड ।लोकमत न्यूज नेटवर्कलोणबेहळ : शेतीचे हेल्थकार्ड तयार करण्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. लागवड खर्च वाढत असल्याने तो कमी करण्यासाठी माती परीक्षणावर भर दिला जात आहे. शासनस्तरावर पाठपुरावा होत असला तरी प्रत्यक्ष गावातील चित्र वेगळे आहे. हा माती परीक्षण कार्यक्रम कागदोपत्रीच राबविला जातो. कृषी विभागाची स्थानिक पातळीवरील यंत्रणा गंभीर नसल्याने शेतकरी हिताच्या योजनेचा बोजवारा उडाला आहे.शेती उत्पादनासाठी शेतकºयांना कृषी केंद्रचालकच मार्गदर्शन करतात. अधिक नफ्याची उत्पादने व बियाणे शेतकºयांच्या माथी मारली जाते. त्यामुळे दरवर्षी शेतकरी कोणत्या ना कोणत्या कारणाने नापिकीच्या चक्रात अडकतो. शेतीचा खर्च कमी करण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. या खरीप हंगामापूर्वी माती परीक्षण करून प्रत्येक शेतकºयाकडे मातीचे हेल्थकार्ड सोपविणे आवश्यक होते. शासनस्तरावरून तसा कार्यक्रमही आखण्यात आला.शास्त्रशुद्ध पद्धतीने नमुने गोळा करून परीक्षणाबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी क्षेत्र सहायक असलेल्या कृषी सहायकांवर आहे. मात्र हा वर्ग पूर्णत: शेतकºयांकडे दुर्लक्ष करून आहे. गावात फिरकत नाही. तालुक्याच्या ठिकाणावरूनच कारभार केला जातो. कधी कधी रस्त्यावरच्या गावात ठिय्या देऊन नियोजन केले जाते. अंतर्गत भागात कुणी जाण्यास तयार नाही. परिणामी शेतकरी परंपरागत पद्धतीने पिकाला खतपाणी देतो. यात त्याची फसगत होते. मुळात मातीमध्ये कुठले अन्नद्रव्य कमी आहे, अधिक आहे याची माहिती नसल्याने खतांचा वारेमाप वापर होतो. आर्थिक बजेट वाढतो.सोबतच खताच्या अतिवापराने अपेक्षित उत्पन्न हाती येत नाही. यामुळे शेतकरी पूर्णत: नागवला जातो. शेती हिताचा माती परीक्षण राबविणे गरजेचे आहे. काही सुज्ञ शेतकरी या कार्यक्रमाबाबत स्थानिक कृषी विभागाकडे विचारणा करतात. त्यांनाही अनुकूल प्रतिसाद मिळत नाही. उडवाउडवीची उत्तरे देऊन मार्गी लावले जाते.आर्णी तालुक्यातील कृषी विभागाची यंत्रणा पूर्णपणे जलयुक्त शिवारच्या मागे आहे. अर्थार्जनात व्यस्त आहे. यामुळे अनेक कृषी कर्मचाºयांनी दुसºयांच्या नावाने चक्क कंत्राट घेणे सुरू केले आहे. त्यामुळेच शेतकरी सतत नापिकीच्या चक्रव्यूहात अडकत आहे. वारेमाप कीटकनाशकाचा वापर करून शेतकºयांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही कृषी विभागाची यंत्रणा शेतीसाठी काम करण्यास तयार नसल्याचे भयावह वास्तव दिसून येते.मिनी कीट व मोबाईल व्हॅनची उपयोगिता काय ?माती परीक्षणासाठी महसूल मंडळस्तरावर प्रत्येक ठिकाणी मिनी किटचे वितरण केले आहे. याशिवाय पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या यवतमाळ येथील केंद्राकडे फिरत्या प्रयोगशाळेसाठी मोबाईल अद्यावत व्हॅन दिली आहे. त्यानंतरही गावात जाऊन कुणीही माती परीक्षणासाठी मार्गदर्शन करताना दिसत नाही. केवळ शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी माती परीक्षण अहवाल मागविला जातो. मात्र खरीप, रबी, उन्हाळी पिकांची लागवड करण्यापूर्वी मातीची तपासणी होत नाही. एकप्रकारे कृषी साहित्य विक्रेत्यांना पूरक व्यवस्था कृषी विभागाकडून निर्माण केली जात आहे. त्यामुळे निकृष्ट उत्पादने शेतकरी वारेमाप वापरत आहे.