शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

विभागीय कार्यालयाची यंत्रणा झाली खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:27 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाचा बेताल कारभार सुरू आहे. अधिकारी त्यांच्या सोयीनुसार जबाबदारी पार पाडत असल्याने इतर कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा प्रचंड त्रास होत आहे.

ठळक मुद्देएसटीच्या सेवानिवृत्तांना हेलपाटे : आस्थापना कर्मचारी नियंत्रणाबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाचा बेताल कारभार सुरू आहे. अधिकारी त्यांच्या सोयीनुसार जबाबदारी पार पाडत असल्याने इतर कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा प्रचंड त्रास होत आहे. विभागीय कार्यालयांतर्गत जवळपास सर्वच विभागाचा कारभार नियंत्रणात आणण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची गरज या ठिकाणी व्यक्त केली जात आहे.विभाग नियंत्रक कार्यालयातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी वाटेल तेव्हा येतात, सोईनुसार निघून जातात. लेखा शाखेतील जबाबदार ? अधिकारी, कर्मचारी टेबलवर सापडले तर नशिबच समजावे लागते. चालक, वाहक, यांत्रिक यांच्या वार्षिक वेतनवाढी, ग्रेडेशनची रखडलेली प्रकरणे ही लेखा शाखेतील कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य तत्परतेची पावती आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अंतिम देयकातील सुप्रमाची रक्कम गेली पाच - सहा महिन्यांपासून आॅडीटसाठी प्रलंबित ठेवली आहे. या सेवानिवृत्तांना या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. प्रकरण निकाली काढले जाईल या आशेने सेवानिवृत्त कर्मचारी तासंतास संबंधित कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करीत बसतात. शेवटी टेबलवर बसलेले आॅडीट अधिकारी दोन-चार दिवसांनी या, असे सांगून सेवानिवृत्तांची अवहेलना करतात.आस्थापना शाखेतील कर्मचाऱ्यांना कामाविषयी थोडीही आस्था राहिलेली नाही. कार्यालयीन वेळेचे त्यांनी ‘बारा’ वाजवले आहे. बाहेर आगारातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांला त्यांची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसते.वाहतूक शाखेच्या कारभारालाही गैरप्रकाराची वाळवी लागली आहे. पथकातील वाहनाचा दुरूपयोग, शिक्षकांना दिल्या गेलेल्या किलोमीटर दर्शविणाऱ्या प्रमाणपत्रात अनियमितता झाली असल्याची चर्चा खुद्द या विभागात आहे. भविष्यनिर्वाह निधीचा टेबल सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची बहुतांश वेळा प्रतीक्षा करावी लागते. संबंधित अधिकारी सदर प्रकार का सहन करून घेतात हा प्रश्न आहे. विभागीय कार्यालयाची घडी एवढी विस्कळीत झालेली असताना वरिष्ठ अधिकारी बिनधास्त असल्याने नवल व्यक्त होत आहे.अपराध शाखेत टाईमपासअपराध शाखेतील अधिकारी विविध कारणांमुळे इतर आगाराच्या दौऱ्यावर असल्याच्या संधीचा पुरेपूर फायदा या विभागातील इतर कर्मचारी घेतात. काही न्यायालयीन कामे सांगून बाहेर असतात तर काहींचा कार्यालयाबाहेरच फेरफटका सुरू असतो.

टॅग्स :state transportएसटी