शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तहसील कार्यालयासमोर आदिवासी छात्र संघाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST

२0१५-१६ मध्ये राज्य सरकारने त्यात बदल करून डीबीटी योजना सुरू केली. या योजनेमुळे सोयी, सुविधा वसतिगृहामार्फत मिळणे बंद झाले. सुविधांसाठीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची योजना सुरू केली. मात्र योजनेत अनेक त्रुटी आहे. रक्कम खात्यात वेळेवर जमा होत नाही. तसेच प्राप्त रक्कमेत सुविधांची पूर्तता होत नाही. खºया व गरजू लाभार्थ्यांपर्यंत रक्कम पोहोचू शकत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी पैशाअभावी शैक्षणिक गरजा वेळेवर पूर्ण करू शकत नाही. 

ठळक मुद्देडीबीटी योजना बंद करा

  लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाने शुक्रवारी येथील तहसील कार्यालयासमोर डीबीटी योजना बंद करण्यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले.पूर्वी आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहामार्फत शैक्षणिक सोयी, सुविधा, निवास व भोजन व्यवस्था मिळत होत्या. मात्र २0१५-१६ मध्ये राज्य सरकारने त्यात बदल करून डीबीटी योजना सुरू केली. या योजनेमुळे सोयी, सुविधा वसतिगृहामार्फत मिळणे बंद झाले. सुविधांसाठीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची योजना सुरू केली. मात्र योजनेत अनेक त्रुटी आहे. रक्कम खात्यात वेळेवर जमा होत नाही. तसेच प्राप्त रक्कमेत सुविधांची पूर्तता होत नाही. खºया व गरजू लाभार्थ्यांपर्यंत रक्कम पोहोचू शकत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी पैशाअभावी शैक्षणिक गरजा वेळेवर पूर्ण करू शकत नाही. थकीत डीबीटीची रक्कम त्वरित अदा करावी. विद्यार्थ्यांची नूतनीकरणाची प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन राबवावी. शिष्यवृत्तीची थकबाकी त्वरित अदा करावी. कॉलेजचे शुल्क एकरकमी न घेता सवलतीप्रमाणे भरण्याची मुभा द्यावी, आदी मागण्यांसाठी धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन  उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना  पाठविण्यात आले.आंदोलनात पुसद, उमरखेड, दिग्रस, महागाव, दारव्हा तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होते. आंदोलनाला गणपतराव गव्हाळे, अयुबखान तहसीन, ज्ञानेश्वर तडसे, तिलक राठोड आदींनी समर्थन दिले. यावेळी विद्वान केवटे, शिवाजी मळघणे, ऋषिकेश देवसरकर, कुलदीप देवसरकर, विकास गावंडे, समाधान पंडागळे, आत्माराम शेळके, ज्ञानेश्वर ढाकरे, गजानन बोडके, सिद्धेश्वर मुकाडे, रामदास टारफे, राजेश डाखोरे,  हनुमंत पारधी, राजेश झांबरे, विकास झांबरे, श्रीरंग वानोळे,  अविनाश वाळकेसह विद्यार्थी सहभागी होते.

 

टॅग्स :TahasildarतहसीलदारStudentविद्यार्थी