शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

कळंबला नगरपरिषदेचा दर्जा देण्याची मागणी

By admin | Updated: May 17, 2014 00:30 IST

महाराष्ट्र शासनाने नुकताच कळंब ग्रामपंचायतला नगर पंचायतीचा दर्जा देण्याची घोषणा केली. परंतु कळंब शहराचा पसारा आणि व्याप्ती लक्षात घेता कळंबला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा,

कळंब : महाराष्ट्र शासनाने नुकताच कळंब ग्रामपंचायतला नगर पंचायतीचा दर्जा देण्याची घोषणा केली. परंतु कळंब शहराचा पसारा आणि व्याप्ती लक्षात घेता कळंबला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी कळंबवासीयांची आहे. यासाठी वारंवार ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींनाही नागरिकांकडून विनंती करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी कळंब ग्रामपंचायतने नगर परिषदेचा दर्जा देण्यासाठी एकमताने ठराव पारीत केला होता. यासाठी सत्तारुढ व विरोधी सदस्यही एकत्र आले होते. तसेच खासदार, आमदार व जिल्हा परिषद अध्यक्षाकडेही नगर परिषदेसाठी प्रयत्न करण्याकरिता वारंवार मागणी करण्यात येत होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नगर परिषदेऐवजी नगर पंचायतची घोषणा शासनाच्यावतीने करण्यात आली. परंतु शासनाच्या या घोषणेचा कळंबवासीयांना फारसा आनंद झाला नाही. कळंब येथे अनेक शासकीय तसेच निमशासकीय विभागाचे स्वतंत्र्य कार्यालय आहे. कळंबची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच पुनर्वसीत थाळेगावचा कळंब ग्रामपंचायतमध्ये समावेश करण्याची मागणी आहे. त्यामुळे कळंब शहराच्या क्षेत्रफळात मोठी वाढ होणार आहे. सध्यस्थितीत शहराचा पाहीजे तसा विकास झालेला नाही. त्यामुळे नगर परिषदेचा दर्जा देऊन विकासाचा मार्ग सुकर करावा, अशी जनतेची मागणी आहे.

कळंब तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. विशेष म्हणजे या तालुक्याचा समावेश आदिवासी राखीव मतदार संघामध्ये होतो. दिवसेंदिवस कळंब शहराचा विस्तार वेगाने वाढू लागला आहे. ले-आऊटचे जाळे मोठय़ा प्रमाणात पसरु लागले आहे. परंतु नागरिकांना पर्याप्त सुविधा पुरविताना ग्रामपंचायत अपुरी पडत आहे. अपुर्‍या सुविधा असलेल्या ले-आऊटचा भार ग्रामपंचायतवर पडत आहे. त्यामुळे ले-आऊट मान्यतेपुर्वी नियमानुसार सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच त्यांना मान्यता देणे गरजेचे आहे. या परिस्थितीत ग्रामपंचायतच्या र्मयादा लक्षात घेता नगर परिषदेची स्थापना करणे महत्वाचे आहे. (तालुका प्रतिनिधी)