शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

निवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांवर ऊहापोह

By admin | Updated: February 10, 2016 03:13 IST

बालवाडी ते विद्यापीठस्तरावरील निवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर येथे झालेल्या चौथ्या जिल्हा अधिवेशनात ऊहापोह करण्यात आला.

खैरी : बालवाडी ते विद्यापीठस्तरावरील निवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर येथे झालेल्या चौथ्या जिल्हा अधिवेशनात ऊहापोह करण्यात आला. लोक विद्यालयात झालेल्या या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार बुटे होते. दीप प्रज्वलन आणि स्वागतगीताने अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली. उद्घाटन शिक्षण निरीक्षक रामभाऊ तुरणकर यांच्या हस्ते झाले.बालवाडी ते विद्यापीठीय निवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनतर्फे हे अधिवेशन घेण्यात आले. निवृत्तांना किमान मासिक वेतन ३ हजार ५०० रुपये, १ जुलै २०११ नंतर निवृत्त झालेल्यांना राज्य शासनाने लागू केलेली योजना, निवृत्ती वेतन लागू करताना कुठलाही भेदभाव ठेवला जाऊ नये, केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातही स्वतंत्र पेन्शन विभाग मंत्रालयात स्थापन व्हावा, १ जुलै १९७२ नंतर सेवेत रुजू झालेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांनाही पेन्शन, उपदानाची रक्कम १० लाख रुपये व्हावी, जुलै २०१५ ते जानेवारी २०१६ या सात महिन्याच्या सहा टक्के वाढीव महागाई भत्त्याची रक्कम मिळावी, पेन्शनर्सची शिखर संघटना महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनला मान्यता द्यावी आदी ठराव या अधिवेशनात घेण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे, जिल्हाध्यक्ष प्रा. ए.एम. गोरंटीवार, जिल्हा सचिव व्ही.बी. टोंगे, टी.ए. ताटेवार, एम.जी. गाडगे, एन.बी. महाजन आदी उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. अधिवेशनासाठी पी.एस. महाजन, एन.बी. महाजन, एल.एल. गौरकार, महाजन, पी.एस. घुमे, शा.गु. सरोदे, अंबादास कुटे, एम.बी. सरोदे, के.के. निवल, भेदूरकर, खैरकार आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)