शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

हृदयस्थ श्रद्धास्थानाच्या वाटेवरच मृत्यू बसला होता दबा धरून..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 05:00 IST

दिग्रस शहरातील बाराभाई मोहल्ल्यातील १२-१३ युवक खासगी वाहनाने नागपूर येथील ताजुद्दीन बाबा यांच्या शाही संदलसाठी शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास निघाले होते. पहाटे नागपूर येथे दर्गाहवर पाेहोचल्यावर त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ते सर्व जण नागपूर जिल्ह्यातीलच कामठी येथील दुसऱ्या अम्मा दर्गाहवर गेले. हे युवक कन्हान नदीत आंघोळीला उतरले; परंतु नदीचा प्रवाह वेगवान असल्याने ते अचानक वाहून गेले.

प्रकाश सातघरेलोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : मृत्यू कुठे कधी कसा माणसाला गाठेल सांगता येत नाही. जीवनातील अडी-अडचणींचा निपटारा व्हावा म्हणून माणूस आपल्या श्रद्धास्थानाकडे धाव घेतो. मात्र, अशा श्रद्धेच्या वारीदरम्यानच कधी-कधी मृत्यू वाटेत दबा धरून बसलेला असतो. दिग्रसमधील पाच युवकांवरही रविवारी काळाने असाच घाला घातला. नागपूर जिल्ह्यात नदीत बुडून बेपत्ता झालेल्या या पाच युवकांच्या घरात एक हलकल्लोळ उडाला आहे.दिग्रस शहरातील बाराभाई मोहल्ल्यातील १२-१३ युवक खासगी वाहनाने नागपूर येथील ताजुद्दीन बाबा यांच्या शाही संदलसाठी शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास निघाले होते. पहाटे नागपूर येथे दर्गाहवर पाेहोचल्यावर त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ते सर्व जण नागपूर जिल्ह्यातीलच कामठी येथील दुसऱ्या अम्मा दर्गाहवर गेले. सकाळी यामधील खाजा बेग कालू बेग (१९), अयाज बेग हाफीज बेग (२२), सय्यद  लक्की सय्यद परवेज (२०), सबतैन शे. इकबाल (२०), मुहम्मद अबुजर मुहम्मद अल्ताफ (२०) हे युवक कन्हान नदीत आंघोळीला उतरले; परंतु नदीचा प्रवाह वेगवान असल्याने ते अचानक वाहून गेले. प्रशासनाने त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू केला आहे.यापैकी चार युवकांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मुहम्मद अबुजर हा आई-वडिलांना एकुलता होता. खाजा बेग कालू बेग हा नवव्या वर्गात शिकतो. त्याला आई-वडील, एक भाऊ असून वडील फळविक्रीचा व्यवसाय करतात. अय्याज बेग हाफीस बेग हा बारावीचा विद्यार्थी असून त्याचे वडील सायकल स्टोअर्सचा व्यवसाय करतात. आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा त्याचा परिवार आहे. सै. लक्की सै. परवेज हा बीएला शिकत असून त्याला वडील नाहीत. त्याच्या वडिलांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. शे. अबुजर शे. अलताप हा अकरावीत शिकत असून त्याच्या परिवारात आई-वडील, दोन बहिणी आहेत. त्याचे वडील नगर परिषदेमध्ये नोकरीला आहेत. शे. सबतैन शे. इकबालला आई-वडील, एक बहीण, एक भाऊ असून तो बारावीचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील दुकानात काम करतात.अत्यंत सर्वसामान्य परिवारातील पाच मुले एकाच वेळी नदीत बुडून बेपत्ता झाल्याने पाच कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. हे पाचही परिवार रविवारी सकाळीच नागपूर-कामठीकडे रवाना झाले.

दिग्रसच्या बाराभाई मोहल्ल्यात शोककळाबाराभाई मोहल्ला हा सतत चहलपहल असणारा मोहल्ला आहे. मात्र रविवारी या भागातील पाच जण बुडाल्याची वार्ता कळताच मोहल्ल्यात शोककळा पसरली आहे. या वाॅर्डातील रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. 

 

टॅग्स :Deathमृत्यूKanhan Riverकन्हान नदी