शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्यामुळे गर्भवतीचा दुर्दैवी मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 12:30 IST

ओले कपडे विजेच्या तारावर वाळू घालत असताना धक्का लागून सासू आणि सुनेचा मृत्यू झाल्याची घटना मारेगाव तालुक्याच्या कुंभा येथे घडली आहे.

यवतमाळ : ओले कपडे विजेच्या तारावर वाळू घालत असताना धक्का लागून सासू आणि सुनेचा मृत्यू झाल्याची घटना मारेगाव तालुक्याच्या कुंभा येथे घडली आहे.  शुक्रवारी (22 जून) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही  घटना घडली आहे. सुनेला वाचवण्याच्या प्रयत्नात सासूलाही प्राण गमवावा लागला. सुनिता शंकर मोहुर्ले (२५) आणि शकुंतला वामन मोहुर्ले (५०) अशी मृतांची नावे आहे. सुनिता पाच महिन्याची गरोदर होती. मोलमजुरी करणा-या कुटुंबातील सर्वांनी सकाळी नेहमीप्रमाणे आंघोळ केली. कपडे धुतल्यानंतर ते वाळू घालण्यासाठी सुनिता तारावर टाकत होती. त्याच वेळी या तारात वीज प्रवाहित होऊन तिला जबर धक्का बसला. ती खाली कोसळली. तिच्या आवाजाने घरात असलेली सासू धावत आली. 

तिने सुनेला स्पर्श करताच तिलाही विजेचा जबर धक्का बसला. या प्रकाराने शेजारील मंडळी धावून आले. वीज पुरवठा बंद करून दोघींनाही वणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले. सुनिताच्या मागे पती, पाच वर्षाचा मुलगा आणि सासरा आहे. या घटनेने कुंभा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात