शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा वन विभागातील मांडवा शिवारात वाघिणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 18:50 IST

पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयाअंतर्गत घाटंजी वनपरिक्षेत्रातील मांडवा शिवारातील तळ्याजव‌‌ळ शनिवारी एका पट्टेदार वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळ‌ून आल्याने वनवर्तुळात खळ‌बळ उडाली आहे.

संतोष कुंडकर

पांढरकवडा (यवतमाळ): पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयाअंतर्गत घाटंजी वनपरिक्षेत्रातील मांडवा शिवारातील तळ्याजव‌‌ळ शनिवारी एका पट्टेदार वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळ‌ून आल्याने वनवर्तुळात खळ‌बळ उडाली आहे.  २८ जानेवारीला सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे वन विभाग खडबडून जागा झाला आहे.

वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे गुढ कायम आहे. शनिवारी सकाळी वनरक्षक मांडवा गस्तीवर असताना त्याला कुजल्याचा दुर्गंध आला. त्याने परिसरात शोध घेतला असता, एक पट्टेदार वाघिण मृत अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. संबंधित वनरक्षकाने तात्काळ याबाबत वरिष्ठांना माहिती दिली.  या वाघिणीचा मृत्यू पाच ते सहा दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या क्षेत्रात आणखी तीन ते चार वाघ फिरत आहेत. मृत वाघिणीचे संपूर्ण अवयव शाबूत आहेत.

घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. पंचनामा करून वाघिणीचे घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले. सहायक वन संरक्षक सुभाष दुमारे, रणजीत जाधव व वनपरिक्षेत्राधिकारी हेमंत उबाळे यांच्या उपस्थितीत वाघिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वाघिणीचा मृत्यू नेमका कशाने?

वाघिण मांडवा बिटात पाण्याच्या तलावाजवळ मृत अवस्थेत पडून होती. कुजल्यामुळे सर्वत्र दुर्गंध सुटला होता. या वाघिणीचा मृत्यू नैसर्गिकरित्या की दोन वाघांच्या लढाईत झाला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.  

वाघाचे वय अंदाजे सहा ते सात वर्षे असून, या वाघाचा मृत्यू हा नैसर्गिकरीत्या झाला असल्याचा अंदाज आहे. शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण कळणार आहे.

- सुभाष दुमारे , सहायक वनसंरक्षक, पांढरकवडा

टॅग्स :Yavatmalयवतमाळ