शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा वनपरिक्षेत्रात दीड वर्षीय वाघिणीचा मृत्यू, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 17:15 IST

मृत वाघिणीचे सर्व अवयव शाबूत

पांढरकवडा (यवतमाळ): वनविभागाच्या पांढरकवडा वनपरिक्षेत्राअंतर्गत अर्ली वर्तुळातील अर्ली नियतक्षेत्रात एका दीड वर्षीय वाघिणीचामृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वाघिणीचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे मात्र गुलदस्त्यात आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी या वाघिणीचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

वनरक्षक सुरेश मुडांले हे ११ ऑक्टोंबर रोजी जंगलात गस्त करीत असताना दुपारी १२:१० वाजताच्या सुमारास अर्ली वर्तुळातील अर्ली नियतक्षेत्रातील सागवान वृक्षाच्या खाली एक वाघिण मृतावस्थेत आढळून आली. त्यांनी लगेच याबाबत वरिष्ठ अधिकारी तसेच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असल्याचे दिसून आले. या वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, बाबतची शाहनिशा करण्यासाठी सहाय्यक आयुक्त तथा पशुधन विकास अधिकारी ए. पी. ओंकार यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

मृत वाघिणीचा पंचनामा करून मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. तिचे वय अंदाजे दीड वर्षांचे असावे, असा अंदाज आहे. वाघिणीच्या मृतदेहाचे विच्छेदन करून अवयवांचे नमुने काढून सीलबंद करण्यात आले. त्यानंतर त्याच ठिकाणी वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी घटनास्थळी यवतमाळ वनवृत्ताचे वनसंरक्षक व्ही. टी. घुले, विभागीय वन अधिकारी, ए. एन. दिघोळे, मानद वन्यजीव रक्षक रमजान विराणी, सहाय्यक वनसंरक्षक आर. बी. कोंडावार, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.डी. सुरवसे, व वनकर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूYavatmalयवतमाळ