शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महसूल पथकावर माती तस्करांचा जीवघेणा हल्ला; तलाठी गंभीर, वाहनचालक किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 01:26 IST

ही घटना बुधवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान उघडकीला आली

संजय भगत, महागाव (यवतमाळ): गौण खनिजाची चोरी होत असल्याच्या माहितीवरून महागाव तहसील कार्यालयाचे तलाठी मंडळ अधिकारी व त्यांचे इतर सहकारी काळी टेंभी येथे गेले असता माती भरून  चोरून नेत असल्याचे काही ट्रॅक्टर त्यांच्या हाती लागले होते. त्याची कार्यवाही करत असताना अचानकपणे गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमानी तलाठी मंडळ अधिकारी व शासकीय वाहनाचे चालक आडे यांच्यावर चांगलाच जीवघेणा हल्ला केला आहे. त्यामध्ये तलाठी गणेश मोळके हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंडळाधिकारी संजय नरवाडे वाहन चालक आडे यांनाही मारहाण करण्यात आली ही घटना बुधवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान उघडकीला आली आहे. घटनेची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आली असून या घटनेमुळे महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी यांनी महागाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली त्यावेळी तालुक्यातील गौण खनिज चोरी बाबत फुलसावंगी परिसराचे तलाठी  व मंडळ अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले होते. कार्यवाही टाळण्यासाठी तहसीलचे पथक बुधवारी रात्री दहा वाजता फुलसावंगी परिसरामध्ये कार्यवाही करण्यासाठी गेले असता या पथकावर हल्ला चढवण्यात आला आहे. उशिरावर अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी