वन अधिकाऱ्यांची लपवालपवी कशासाठी ?बिबट मरण पावलेल्या ठिकाणी यवतमाळचे वन परिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी आणि त्यांच्या वरिष्ठांनी बरीच लपवालपवी आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपली निष्क्रीयता उघड होऊ नये म्हणून त्यांचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. याच भागात गेल्या काही वर्षात आतापर्यंत तीन बिबट मृतावस्थेत आढळले आहे. याला वन अधिकाऱ्यांची निष्क्रीयताच कारणीभूत मानली जात आहे. शुक्रवारी उघडकीस आलेल्या बिबटाच्या मृत्यूला प्रसार माध्यमांना ‘फ्लॅश’ मिळणार नाही याची खास खबरदारी आरएफओ मडावी व त्यांच्या वरिष्ठांनी पुरेपूर घेतल्याचे दिसते. यवतमाळ वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे. सागवान तोड व तस्करी होत असताना आरएफओ कार्यालयाकडून त्याला अप्रत्यक्ष संरक्षण देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. आरएफओ मडावी यांची ही ‘मिलीभगत’ यापूर्वी पिंपळखुटी आरटीओ चेक पोस्टवर पांढरकवडा येथील वन अधिकाऱ्यांनी पुराव्यानिशी उघड केली आहे. त्या प्रकरणात खुर्ची वाचविण्यासाठी मडावी यांनी एका मद्यसम्राटाच्या मध्यस्थीने सत्ताधाऱ्यांकडे राजकीय आश्रय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा यवतमाळ वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीने डोकेवर काढले आहे. सागवान तस्कर सक्रिय झाले असून त्यांना वन प्रशासनातूनच संरक्षण मिळत असल्याचे वन वर्तुळातच बोलले जाते.
सोनखास जंगलात बिबट मृतावस्थेत
By admin | Updated: November 12, 2016 01:40 IST