शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

डेअरीमधील मिष्ठान्नाची तपासणीच नाही; भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 17:08 IST

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : दुकानांची तपासणी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : शहर व तालुक्यात सणासुदीच्या दिवसात भेसळयुक्त मिष्ठान्न पदार्थ विक्री करणाऱ्यांची संख्या मोठी वाढली आहे. पांढरकवडा शहर व ग्रामीण भागातील विविध स्वीट मार्ट तथा दूध डेअरीमधून विकण्यात येणाऱ्या मिष्ठान्न पदार्थांच्या शुद्धतेबाबत ग्राहकातून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या वतीने स्वीट मार्ट तथा दूध डेअरीमधून विकण्यात मिष्ठान्नाची तपासणीच करण्यात येत नाही आहे.

शासनाने प्रत्येक स्वीट मार्ट तथा दूध डेअरीमधून विक्री करण्यात येणाऱ्या पदार्थांबाबत ते किती दिवस आधी तयार करण्यात आले. किती दिवसपर्यंत ते खाण्यायोग्य राहील, याचे फलक लावण्याचे आदेश दिले होते. परंतु, पांढरकवडा शहरातील अनेक दुकानांमध्ये मिष्ठान्न पदार्थांबाबत असे फलक दिसून येत नाही. मिष्ठान्नाची एक्सपायरी डेट निघून गेल्यानंतरसुद्धा ते मिष्ठान्न ग्राहकांच्या माथी मारण्यात येत असल्याचे प्रकार येथे घडत आहे. ग्राहकांना कित्येक दिवसाआधी बनविण्यात आलेले पदार्थ विक्री करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शहरात दैनंदिन दुधापासून तयार करण्यात येणारे शेकडो किलोचे मिष्ठान्न विक्री करण्यात येत असते. सध्या नवरात्रौत्सव तथा सणासुदीचा काळ सुरू असल्याने मिष्ठान्न पदार्थांच्या विक्रीत दुप्पट, तिप्पट प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे तालुक्यात गोधन नामशेष होण्याच्या मार्गावर असताना दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांसाठी दूध येते तरी कुठून?, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

शहर व तालुक्यात बाहेरून आलेल्या परप्रांतीयांचीच जास्त, तर स्वीट मार्ट तथा दूध डेअरी आहे. त्यांना तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यांशी काहीही देणे, घेणे नाही. ते फक्त पैसे कमविण्याकरिता केमिकलने तयार केलेले भेसळयुक्त मिष्ठान्न व पदार्थ विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहे, परंतु याकडे लक्ष देण्यास अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी तयार नाही. 

"पांढरकवडा तालुक्यातील दुकानांची तपासणी करणे सुरू आहे. तपासणीत काही गैरप्रकार आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल."- एस.आर. सूरकर, अन्न सुरक्षा अधिकरी, यवतमाळ 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ