शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

दाभाडीच्या महिलांचा घागर मोर्चा

By admin | Updated: January 10, 2015 23:03 IST

झरीजामणी तालुक्याच्या आढावा सभेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. त्यांना धारेवर धरून जनतेच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याचे निर्देश दिले.

मुकुटबन : झरीजामणी तालुक्याच्या आढावा सभेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. त्यांना धारेवर धरून जनतेच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याचे निर्देश दिले.झरी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात गुरूवारी ही आढावा सभा घेण्यात आली. तब्बल सहा तास चाललेल्या सभेत जनतेने विविध समस्यांचा पाढा वाचला. आमदारांनी महसूल विभागाच्या कारभारावर तीव्र नापसंती दर्शविली. ही सभा पाणी प्रश्नावर चांगलीच गाजली. ही सभा सुरू होताच दाभाडी येथील पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी खुद्द सभास्थळी महिलांनी घागर मोर्चा आणला. आमदारांनी महिलांची समस्या ऐकून घेतली. त्यांना त्वरित समस्या निकाली काढण्याची ग्वाही दिली. यानंतर जवळपास २० गावांचा पाणी प्रश्न सभेत मांडण्यात आला. आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरून पुढाऱ्यांसारखे आश्वासन न देता काम होत असेल तर सांगा, असे खडसावले. वल्हासा येथे मागील १० वर्षांपासून पाणी समस्या असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. धानोरा, लहान मार्की, येदलापूर, गाडेघाट, झरी, अडकोली, मुकुटबन, हिवरा, बोटोणी, बोपापूर, बाळापूर, सुसरीपेंढरी, झमकोला, राजणी, माथार्र्जुन, वरपोड येथील ग्रामस्थांनीही पाणी समस्या कथन केली. येदलापूर येथे टँकरने पाणी पाठविल्याचे सांगण्यात आले. झरी आश्रमशाळेत विजेअभावी पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अडकोली येथे ग्रामपंचायतीला बोअर अधिग्रहण केल्याचे मागील चार वर्षांपासून पैसे न मिळाल्याचे सदस्यांनी सांगितले. मुकुटबन येथील भारत निर्माण प्रकल्पाचा मुद्दाही उपस्थित झाला. माथार्जुन पाणी पुरवठा संदर्भात जागरूक नागरिकांनी हिस्ट्री शीट मागितली. ती अधिकाऱ्यांना देता आली नाही. अनेक सचिवांना प्रश्नांची उत्तरे देता आली नसल्याने गटविकास अधिकारी मेघावत यांनी त्याचा खुलासा करून जनतेला समजाविण्याचा प्रयत्न केला. एका सचिवाच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश आमदारांनी दिले.ग्रामस्थांनी महावितरणप्रती असंतोष दर्शविला. वीज येण्यापूर्वीच खांब उभे केले जात असल्याचे खडकडोहच्या ग्रामस्थांनी लक्षात आणून दिले. खडकी येथील ग्रामस्थांनी शौचालयाचा प्रश्न उपस्थित केला. पंचायत समितीमधील विविध विभागांच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीबाबत गटविकास अधिकाऱ्यांना नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. अन्न पुरवठा, महसूल, भूमिअभिलेख, महावितरण आदी विभागांबाबत सभेत प्रश्नांचा भडीमार झाला. तालुक्यात प्राथमिक शिक्षणाची दशा अत्यंत बिकट असून त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)