शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पाणीदार गावांसाठी अंकितची सायकलस्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:56 IST

दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या राज्यातील गावांना पाणीदार करण्याची ही नामी संधी आहे. दुष्काळाला संकट न समजता संधी समजून त्याचा मुकाबला करण्याबाबत जनाजगृती करण्यासाठी अंकितने उभ्या महाराष्ट्राची सायकलस्वारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देगावोगावी जागृती : सात दिवसात ७६१ किलोमीटरचा प्रवास, मुंबईला होणार मोहिमेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या राज्यातील गावांना पाणीदार करण्याची ही नामी संधी आहे. दुष्काळाला संकट न समजता संधी समजून त्याचा मुकाबला करण्याबाबत जनाजगृती करण्यासाठी अंकितने उभ्या महाराष्ट्राची सायकलस्वारी सुरू केली आहे.राज्यावर यंदा दुष्काळाचे ढग जमा झाले. हा दुष्काळ गावांना पाणीदार करण्यासाठी उत्तम संधी आहे. हाच धागा पकडून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या अंकित राधेश्याम जयस्वाल याने सायकलवारी सुरू करून गावोगावी जनजागृती करण्याचा वसा घेतला. तो एकूण ७६१ किलोमीटरची वारी करणार आहे. २०१९ ची वॉटर कप स्पर्धा एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. तत्पूर्वी गावांमध्ये जागृतीसाठी अंकीतने मोहीम हाती घेतली. या मोहिमेत सायकलवरून गावोगावी प्रबोधन करण्याचे काम तो करीत आहे.वर्धा जिल्ह्यातील माळेगाव ठेका येथून त्याने मोहिमेला प्रारंभ केला. तो दररोज किमान १५० किलोमिटरचा प्रवास करीत आहे. या प्रवासात लागणाऱ्या गावांमध्ये अंकीत वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गावकºयांना करतो. दुष्काळाला संधी समजून आपले गाव पाणीदार करण्याबबात जागृती करतो. यात त्याला काही प्रमाणात यशही मिळत आहे.बीई मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण करणारा अंकीत बुधवारी कळंबमार्गे सायकलने यवतमाळ जिल्ह्यात पोहोचला आहे. या दरम्यान लागणाऱ्या गावांमध्ये त्याने पाणीदार गावांबाबत जागृती केली. आता तो मेहकर, औरंगाबाद, विंचुर, इगतपुरीमार्गे मुंबईला निघाला आहे. यात तो ७६१ किलोमिटरचा प्रवास पूर्ण करणार आहे.पाणी कमवा, प्रदूषण टाळाआपण केवळ पाण्याचा वापर करतो. मात्र हे पाणी कमाविण्यासाठी प्रयत्न होत नाही. वॉटर कप स्पधेतून पाणी कमाविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात अंकीत जागृती करीत फिरत आहे. उद्याचा महाराष्ट्र संपन्न व्हावा, असा आपला उद्देश असल्याचे त्याने सांगितले.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात पाणीदार गाव चळवळ राबविली जात आहे. यावर्षी ८ एप्रिलपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. २२ मेपर्यंत गावकरी आपले गाव पाणीदार करण्यासाठी अहोरात्र झटणार आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना रोख पारितोषिक दिले जाणार आहे. गावोगावी जागृती होत आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा