ग्राहकांनी जागृत होणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:30 PM2018-03-17T22:30:53+5:302018-03-17T22:30:53+5:30

जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस ग्राहक असतो. मात्र हा ग्राहक हवा त्या प्रमाणात जागृत नसून ग्राहक जागृत होणे आज काळाची गरज असल्याचे मत तहसीलदार किशोर बागडे यांनी व्यक्त केले.

Customers need time to wake up | ग्राहकांनी जागृत होणे काळाची गरज

ग्राहकांनी जागृत होणे काळाची गरज

googlenewsNext
ठळक मुद्देकिशोर बागडे : दिग्रस तहसील कार्यालयात ग्राहक दिन

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस ग्राहक असतो. मात्र हा ग्राहक हवा त्या प्रमाणात जागृत नसून ग्राहक जागृत होणे आज काळाची गरज असल्याचे मत तहसीलदार किशोर बागडे यांनी व्यक्त केले.
येथील तहसील कार्यालयात आयोजित जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. रामदास पद्मावार यांनी प्रस्ताविकातून ग्राहकांची फसगत होत असेल, त्यांनी निर्भयपणे समोर येऊन ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले. ग्राहक मंचाचे अध्यक्ष प्रा.मतीन खान यांनी ग्राहक हक्क कायद्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव, गौरव मांडळे, गोरटे, पुंड, अभियंता खान, अनिल झाडे आदींनीही मार्गदर्शन केले. मंचावर नायब तहसीलदार एस के पांडे, ,अ‍ॅड. अनिल झाडे, दिलीप देशमुख, नवीनचंद गड्डा, पुरवठा विभागाचे कैलास कनाके, रमाकांत सप्रे, रेखा चौधरी, रवींद्र मुंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला तालुक्यातील रास्तभाव दुकानदार, नगरपरिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, तहसीलच्या कर्मचाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते. संचालन गौतम तुपसुंदरे, तर आभार नायब तहसीलदार व्ही.जी. इंगोले यांनी मानले.

Web Title: Customers need time to wake up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.