पुसद शहरामध्ये कोरोना चाचणीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:00 AM2020-08-10T05:00:00+5:302020-08-10T05:00:12+5:30

एकाचवेळी सर्वजण आल्याने गर्दी झाली होती. आरोग्य कर्मचारी व पोलीस त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगबाबत ओरडून सांगत होते. मात्र त्यांचे काहीच चालले नाही. या सभागृहात तीन दिवसात ६१३ टेस्ट झाल्या. त्यात ३३ जण पॉझिटिव्ह आढळले. आता अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ९१, तर एकूण बाधीत ३१0 झाले.

Crowd for corona test in Pusad city | पुसद शहरामध्ये कोरोना चाचणीसाठी गर्दी

पुसद शहरामध्ये कोरोना चाचणीसाठी गर्दी

Next
ठळक मुद्देसभागृहात झुंबड : फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा, जनजागृती करूनही उदासीनता कायमच

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे नागरिक धास्तावले आहे. नागरिकांनी येथील देवराव पाटील चोंढीकर सभागृहात अ‍ॅन्टीजन टेस्टसाठी एकच गर्दी केली आहे.
कोरोनाचे लवकर निदान व्हावे म्हणून येथे अ‍ॅन्टीजन टेस्ट सुरू झाली. शिवाजी विद्यालयाच्या देवराव पाटील सभागृहात चाचणी सुरू आहे. या चाचणीसाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. शनिवारी अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये १३ तर आरटीपीसी टेस्टमध्ये १६ आणि रविवारी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे देवी वॉर्ड, उदासी वॉर्ड, गणेश वॉर्ड, सुभाष वॉर्ड, मोतीनगर, व्यंकटेशनगर, नवीन पुसद, महात्मा फुले वॉर्ड आणि तालुक्यातील पार्डी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील संशयितांना येथील विद्यालयाच्या सभागृहात पाचारण केले होते. एकाचवेळी सर्वजण आल्याने गर्दी झाली होती. आरोग्य कर्मचारी व पोलीस त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगबाबत ओरडून सांगत होते. मात्र त्यांचे काहीच चालले नाही. या सभागृहात तीन दिवसात ६१३ टेस्ट झाल्या. त्यात ३३ जण पॉझिटिव्ह आढळले. आता अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ९१, तर एकूण बाधीत ३१0 झाले.

Web Title: Crowd for corona test in Pusad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.