शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे पीक गेले; यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 17:39 IST

अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतशिवार उद्ध्वस्त केले. पिकांची दुर्दशा पाहून हतबल झालेल्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

यवतमाळ : जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाती आलेला हंगाम हिरावल्यामुळे वैफल्यग्रस्त दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पहिली घटना महागाव तालुक्यातील दहिवड (खुर्द) येथे, तर दुसरी घटना पुसद तालुक्यातील भंडारी येथे घडली.

मनोहर नारायण पवार (३४), असे दहिवड (खुर्द) येथील मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापिकी आणि कर्जाच्या डोंगरामुळे ते निराश होते. खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतशिवार उद्ध्वस्त केले. पिकांची दुर्दशा पाहून हतबल झालेल्या मनोहर पवार यांनी शनिवारी सायंकाळी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, तीन मुली व आप्त परिवार आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

पुसद तालुक्यातील भंडारी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी उघडकीस आली. दुसऱ्या घटनेत अशोक सखाराम आडे (४४), असे भंडारी येथील मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री त्यांनी स्वत:च्या शेतातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावला. ही घटना १४ ऑक्टोबरला उघडकीस आली. ग्रामीण पोलिसांना घटनास्थळ गाठून मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलीस निरीक्षक मोतीराम बोडके यांच्या मार्गदर्शनात जमादार आनंद शेळके, श्याम घुगे, अनिल राठोड तपास करीत आहेत. तहसीलदार डॉ. राजेश चव्हाण यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले. त्यांचा अहवाल आल्यानंतर शासनाकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबास जास्तीत जास्त मदत मिळावी, याकरिता प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे तहसीलदार डॉ. राजेश चव्हाण यांनी सांगितले.

शेतकरी आत्महत्यांची दखल घ्यावी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी मृत शेतकरी मनोहर नारायण पवार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. अति पावसाने शेतकरी उघड्यावर आले आहेत. मात्र, शासन कुंभकर्णी झोपेत आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. शासनाने घोषित केलेली नुकसानभरपाईसुद्धा थंडबस्त्यात आहे. शासनाच्या कोरड्या घोषणांमुळे शेतकरी आत्महत्येच्या दारात पोहोचले असून, शेतकरी आत्महत्यांची दखल मानवाधिकार आयोग आणि संयुक्त राष्ट्रसंघाने घ्यावी, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीagricultureशेती