शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा होरपळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 13:13 IST

निसर्गाच्या लहरीपणाने व दुष्काळामुळे राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट झाल्याचा धक्कादायक अहवाल शासनाने सादर केला. यात सर्वाधिक नुकसान विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे.

ठळक मुद्दे१० हजार हेक्टर शेतजमिनीवरील खडक उघडे

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने व दुष्काळामुळे राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट झाल्याचा धक्कादायक अहवाल शासनाने सादर केला. यात सर्वाधिक नुकसान विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले.सततच्या दुष्काळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहे. मात्र ऋतुचक्र बदलाने फळबाग लागवडच अडचणीत सापडली आहे. गतवर्षी पडलेला अपुरा पाऊस आणि तापलेल्या अतिउन्हामुळे फळबागा होरपळल्या आहेत. यामध्ये संत्रा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी फळबागेच्या नुकसानीचे सर्व्हेक्षणच झाले नाही. यामुळे नुकसानीचा खरा आकडा यापेक्षा मोठा असण्याची शक्यता आहे.कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार पावसाअभावी नागपूर आणि अमरावती विभागासोबत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील १४ हजार हेक्टवरील फळबागा नष्ट झाल्या आहेत. यातून शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला. हे नुकसान भरून न निघणारे आहे. शेतकरी नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करीत असताना निसर्गाचा हा प्रघात झाला आहे. यामुळे शेतकरी चांगलेच खचले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात नुकसानग्रस्त फळबागांचे सर्व्हेक्षणच झाले नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. मात्र कृषी विभागाने हा आरोप फेटाळला आहे. तथापि नेमक्या कुठल्या बागांचे सर्व्हेक्षण झाले आणि कुठल्या बागा सुटल्या, हे कोडेच आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाल्यानंतरच ही बाब स्पष्ट होणार आहे. यामुळे वाळलेल्या फळबागांचे सर्व्हेक्षण न झालेले शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहे.फळबाग लागवडीचा कल कायम राहावा म्हणून कृषी मंत्रालयाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना हेक्टरी सव्वालाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केली. त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळबागांना भाऊसाहेब फुंडकर योजनेतून हेक्टरी ६० हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये फळबाग लागवड करणे आणि ठिबक सिंचनासह इतर बाबींचा समावेश आहे.शेतकऱ्यांचा थेट मंत्र्यांना फोनजिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील शेलोडी येथील विलास परसराम पाटील यांची संत्राबाग करपली. त्यांच्या बागेची नोंद कृषी सहाय्यकानी केली नाही. यामुळे त्यांना हेक्टरी केवळ सहा हजार ४०० रूपयांची मदत मिळाली. फळबागेच्या मदतीला ते मुकले. जिल्ह्यात असे अनेक शेतकरी आहे. त्यामुळे पाटील यांनी थेट कृषीमंत्र्यांकडे तक्रार केली.सर्वाधिक नुकसान चंद्रपूर आणि यवतमाळमध्येगतवर्षी आॅगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतजमिनी खरडून गेल्या. राज्यभरात १० हजार हेक्टरवरील पीक खरडून गेले. यात सर्वाधिक नुकसान चंद्रपूरमध्ये झाले. या जिल्ह्यात तब्बल चार हजार ४१० हेक्टर शेतजमीन खरडून गेली. यवतमाळमध्ये तीन हजार ९९८ हेक्टरचे नुकसान झाले. या ठिकाणी खडक उघडा पडला. ही शेत जमीन दुरूस्त होणे अवघड आहे. तेथे पीक येणार नाही. ही शेती आता बंजर होणार आहे.

टॅग्स :agricultureशेती