शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी संकटात पीक विमा कंपन्या गायब; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 14:30 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के मदत दिली जाणार होती. प्रत्यक्षात विमा कंपनीचे प्रतिनिधी गावाकडे फिरकण्यासाठी तयार नाहीत. यामुळे शेतकरी पुन्हा नागवल्या जात आहे.

ठळक मुद्देसोयाबीनला फुटले कोंब, कपाशीची हानी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अस्मानी संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतशिवारात दररोज कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. अशा स्थितीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के मदत दिली जाणार होती. प्रत्यक्षात विमा कंपनीचे प्रतिनिधी गावाकडे फिरकण्यासाठी तयार नाहीत. यामुळे शेतकरी पुन्हा नागवल्या जात आहे.

यावर्षी बरसणारा पाऊस शेतकऱ्यांवर संकटांची मालिका घेऊन आला आहे. प्रारंभी मूग आणि उडीदाचे पीक हातातून गेले. आता सोयाबीन काढणीला आले आहे. या परिस्थितीत पाऊस थांबण्याचेही नाव घेत नाही. यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना आधार देणार होती. तत्काळ नुकसानीची २५ टक्के मदत दिली जाणार होती. ही बाब केवळ घोषणाच ठरली आहे. विमा उतरविणाऱ्या शेतकरऱ्यांना अजूनही विमा कंपनीच्या प्रतिनिधींचा शोध लागला नाही.

गावपातळीवर दररोज नुकसानीचे पंचनामे करावे लागतील, अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. दररोज नुकसानीचे क्षेत्र वाढत आहे. धुवारी आणि पावसाने कापसाचे बोंड सडले आहेत. ज्वारीचे कणीस काळे पडले आहेत. तुरीवर मर रोगाने आक्रमण केले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देणार कोण, असा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाच हजार शेतकऱ्यांना फटकातीन महिन्यात पाच हजार शेतकऱ्यांच्या शेतात नुकसान झाले. तर ७५ हेक्टर शेतजमीन खरडून गेली. या ठिकाणी नव्याने पीक घेणे सध्या अवघड आहे. त्याकरिता मोठ्या मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

दोन कोटींचे नुकसानकापूस, सोयाबीन, तूर या पिकांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून दोन कोटी २२ लाख रूपयांचा प्रस्ताव कृषी विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. राज्य शासनाच्या तरतुदीनुसारच ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

तीन महिन्यात तीन हजार हेक्टरची नोंदकृषी, महसूल आणि जिल्हा परिषद अशा तीन एजंसीजने एकत्र येत सर्व्हेक्षण केले. जून ते ऑगस्ट अशा तीन महिन्यांच्या सर्व्हेक्षणात तीन हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचा यात कुठेही उल्लेख नाही. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अहवाल गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतीला कोट्यवधीचा फटका बसला.

 

टॅग्स :agricultureशेती