शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

एसटी रोखणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST

यवतमाळात प्रशांत यादव यांच्यासह २५ जणांनी बसस्थानकावर येऊन आगाराच्या मुख्य द्वारावर संप सुरू ठेवून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडविले. आगाराच्या गेटला कुलूप लावले, तसेच अनधिकृत इन-आऊट गेटवरून होणारी वाहतूक बंद केली, अशी तक्रार व्यवस्थापक रमेश उईके यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी कलम १४३, १४७, ३४१ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू होते. २८ ऑक्टोबर रोजी प्रशासनासोबत यशस्वी चर्चा झाल्याने एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने आंदोलन मागे घेतले; मात्र त्यानंतरही १ नोव्हेंबर रोजी यवतमाळ बसस्थानकावर व नेर येथे बसस्थानक परिसरात एसटी बस रोखण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी दोन्ही ठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले. यवतमाळात प्रशांत यादव यांच्यासह २५ जणांनी बसस्थानकावर येऊन आगाराच्या मुख्य द्वारावर संप सुरू ठेवून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडविले. आगाराच्या गेटला कुलूप लावले, तसेच अनधिकृत इन-आऊट गेटवरून होणारी वाहतूक बंद केली, अशी तक्रार व्यवस्थापक रमेश उईके यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी कलम १४३, १४७, ३४१ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नेर येथेसुद्धा दीप्ती नारायण वड्डे यांच्या तक्रारीवरून अनिल श्रीराम राठोड रा. बाणगाव याच्यासह पाच जणांविरुद्ध कलम ३४१, १८६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपींनी एसटी बस क्र. एम.एच.४०/एन.९६०२ अडवून टायरची हवा सोडली होती.तीन आगार वगळता जिल्ह्यातील इतर आगारातील बससेवा सुरळीत झाली असली तरी अद्यापही गाड्यांची संख्या कमी असल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळी सुटीनिमित्त अनेक जण कुटुंबीयांसह गावाकडे जाण्यासाठी निघाले आहे. अशा प्रवाशांची कोंडी झाली आहे. 

तीन आगाराने केल्या केवळ १२ बसफेऱ्या - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे, यासाठी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा सलग सहाव्या दिवशीही प्रभाव कायम होता. मंगळवारी सहा आगारातून बससेवा सुरळीत झाली आहे. तर तीन आगारात अद्यापही आंदोलनाची धग आहे. - मंगळवारी अवघ्या १२ बस गाड्याच या तीन आगारातून बाहेर पडल्या. पांढरकवडा आगारातून केवळ आठ फेऱ्या बाहेर पडल्या. नेर आणि राळेगाव या दोन आगारातून तर प्रत्येकी दोन बसफेऱ्या मार्गावर निघाल्या. या आगारातून महामंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. - ग्रामीण भागातील बसेस बंद असल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांनाही गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. कामगारांच्या या आंदोलनात भाजपही उतरली आहे. बसची हवा सोडण्याचे प्रकार करण्यासोबतच कामात अडथळा आणला जात आहे. अशा प्रकारच्या दोन तक्रारी यवतमाळ आणि नेर येथे दाखल झाल्या आहेत. यावरून यवतमाळ येथे २४, तर नेरमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :state transportएसटी