शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसच्या माजी पदाधिका-यावर अत्याचाराचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 18:37 IST

वणी: विधानसभा मतदारसंघातील युवक काँग्रेसच्या एका माजी पदाधिका-याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वणी: विधानसभा मतदारसंघातील युवक काँग्रेसच्या एका माजी पदाधिका-याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भास्कर वसंतराव गोरे (३८) असे आरोपीचे नाव असून वणी शहरातील एका महिलेच्या तक्रारीवरून रविवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. तो पंचायत समितीचा कंत्राटदारदेखील आहे.गेल्या तीन वर्षांपासून भास्कर गोरे हा ब्लॅकमेल करून आपल्यावर अत्याचार करीत होता, अशी तक्रार पीडित महिलेने रविवारी वणी पोलीस ठाण्यात दाखल केली. भास्करने सुरूवातीला पीडित महिलेच्या पतीशी मैत्री केली. त्यानंतर तिला अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी लावून देतो असे सांगून तिच्याकडून ६० हजार रुपये उकळले. सोबतच तिचे दागिणेही गहाण ठेवण्यासाठी मागितले. त्यानंतर भास्करने आणखी दोन लाख ६५ हजार रुपयांची आपल्याला मागणी केली, असे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.यादरम्यान, भास्करने आपल्याशी लगट करून आपले अश्लील व्हिडीओ, तसेच आॅडिओ तयार करून ब्लॅकमेल करणे सुरू केले. १४ नोव्हेंबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१७ या काळात भास्करने प्रगतीनगरमधील एका घरी नेऊन आपल्यावर सातत्याने अत्याचार केला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी रविवारी पिडित महिला व तिच्या पतीने वणी पोलीस ठाण्यात यासंदर्भात रितसर तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भास्कर गोरे याच्याविरुद्ध भादंवि ३७६ (२) एन, ३५४ (सी), ३८७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी आरोपी भास्कर गोरे याला वणीच्या न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास एसडीपीओ विजय लगारे, ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरलीधर गाडेमोडे करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा