शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अपघातातील ‘त्या’ मृतांवर अंत्यसंस्कार

By admin | Updated: June 2, 2015 00:22 IST

लग्न समारंभावरून परतीच्या प्रवासात असताना काळाने घाला घातलेल्या सहा जणांवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ...

हजारोंची उपस्थिती : प्रत्येकजण हळहळला घाटंजी : लग्न समारंभावरून परतीच्या प्रवासात असताना काळाने घाला घातलेल्या सहा जणांवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रत्येक जण हळहळताना दिसत होता. रविवारी बोलेरो पुलावर आदळून नुक्ती गावाजवळ अपघात झाला होता. अपघातात जागीच ठार झालेल्या हकमुद्दीन काजी (५०) रा. घोटी, अमिनाबी कदीर अली (६५) रा. आर्णी आणि साबेरा युनुस शेख (४०) रा. घाटी यांच्यावर रविवारीच अंत्यसंस्कार करण्यात आले. तर उपचारादरम्यान मृत पावलेल्या नजमा शेख (८), जुबेदा बी अब्दूल शेख (६०) व युनुस शेख (५०) रा. घाटंजी यांच्यावर सोमवारी घाटंजीच्या कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. धार्मिक रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी प्रत्येकजण हळहळताना दिसत होते. घाटंजी येथील शेख इरफान अब्दूल शेख यांच्या मुलाचा विवाह पांढरकवडा येथे रविवारी होता. विवाह समारंभ आटोपून ही मंडळी बोलेरोने घाटंजीकडे परत येत होती. नुक्ती गावाजवळ बोलेरोचा पुढील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण गेले आणि बोलेरो पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. यात तीन जण जागीच ठार झाले. तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. घाटंजी येथे या तिघाचे मृतदेह आणल्यानंतर आप्तस्वकीयांनी एकच आक्रोश केला. परिसरातील शेकडो नागरिक जमले होते. या अपघाताने घाटी येथील राजीव गांधी चौक परिसरातील एकाही घरात चुल पेटली नाही. शेख कुटुंबियावर दु:खाचा डोंगरच कोसळला. (लोकमत चमू) दाम्पत्य आणि वराची आजी ठार नुक्ती गावाजवळ झालेल्या अपघातात युनुस शेख आणि त्यांची पत्नी साबेरा युनुस शेख हे दाम्पत्य या अपघातात ठार झाले. साबेरा बी यांचा जागीच मृत्यू झाला तर पती युनुस शेखचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे दोघेही वराचे चुलत आजी-आजोबा होते. तर या अपघातात ठार झालेली जुबेदा बी अब्दूल शेख ही वराची आजी होती.