नगरपंचायतच्या विरोधात नगरसेवकांचे उपोषण

By admin | Published: December 25, 2016 02:41 AM2016-12-25T02:41:36+5:302016-12-25T02:41:36+5:30

शहरातील समस्यांचे अनेकदा निवेदन देऊन सभागृहात प्रश्न मांडून आणि शहरातील जनतेसोबत

Councilors' fasting against the Nagar Panchayat | नगरपंचायतच्या विरोधात नगरसेवकांचे उपोषण

नगरपंचायतच्या विरोधात नगरसेवकांचे उपोषण

Next

प्रशासन हादरले : घाई गडबडीत कामे करणे सुरू, विकास कामात मोठा घोळ असल्याचा आरोप
मारेगाव : शहरातील समस्यांचे अनेकदा निवेदन देऊन सभागृहात प्रश्न मांडून आणि शहरातील जनतेसोबत नगरपंचायतीवर मोर्चा काढूनही नगरपंचायतीचे प्रशासन कामात सुधारणा करीत नसल्याने शेवटी हतबल झालेल्या विरोधी नगरसेवकांनी शहरातील वृद्ध महिला तरूणासह नगरपंचायत कार्यालयासमोर २४ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले.
शहरातील अनेक वॉर्डातील पथदिवे बंद, पाण्याची समस्या, रस्ते, नालीसफाई, स्वच्छता, घरबंधकाम परवानगी वीज जोडणीचे ना हरकत प्रमाणपत्र, स्थावर संपत्तीची नोंदणी जन्म-मृत्यु नोंद व दाखला आदी गोष्टी गेल्या सहा महिन्यापासून प्रलंबित असल्याने शहरातील जनता त्रस्त झाली आहे. यातच नगरपंचायत घोटाळ्याचे एक-एक किस्से बाहेर येत असल्याने आणि सी.ओ. व कार्यालयातील कर्मचारी यांच्यात तु-तु मै-मै सुरू असल्याने विकास कामांना खीळ बसली आहे. यामुळे त्रस्त असलेल्या शहरातील जनतेने आपल्या समस्या वॉर्डातील नगरसेवकांसमोर ठेवल्या. नगरसेवकांनी या समस्या नगरपंचायत प्रशासनासमोर ठेवल्या. परंतु नगरपंचायत प्रशासन विरोधी नगरसेवकांच्या मागण्या ऐकुण घ्यायलाच तयार नसल्याने आणि प्रशासनाकडून नगरसेवकांनाच अपमानजनक वागणुक मिळत असल्याने शेवटी विरोधी नगरसेवकांनी शहरातील नागरिकांसह २३ डिसेंबर रोजी नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्विकारून चर्चा करताना नगरपंचायत प्रशासन मोर्चेकऱ्यांच्या मागण्या ऐकुण न घेता आपलेच म्हणने पुढे रेटत असल्याने हतबल झालेल्या विरोधी नगरसेवकांनी आणि नागरिकांनी आज २४ डिसेंबरपासून नगरपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरवात केली. उपोषणाला बसलेल्या नगरसेवकांमध्ये खालीद पटेल, भारत मत्ते, नंदेश्वर आसुटकर, जिजाताई वरारकर, अरूणा मोरे, सुरेखा भादीकर, नलिनी ताकसांडे, या नगरसेवकांचा समावेश आहे. तर नागरिकांकडून विप्लव ताकसांडे, प्रकाश वरारकर, मेहमूद खान, अजय लेडांगे, विठाबाई पवार, आकाश भेले, अशोक मांदाडे, राजू पाटील, योगेश वेले, आशिष मेश्राम उपाषणाला बसले आहे. आज उपोषणकर्त्याच्या मंडपाला जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, पंचायत समितीचे उपसभापती गजानन खापने, बाजार समितीचे संचालक रवींद्र धानोरकर यांचेसह तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन मोर्चेकऱ्यांच्या मागण्या जाणून घेत उपविभागीय अधिकारी वणी यांचेशी भ्रम्हणध्वणीवरून बोलून उपाषणकर्त्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावा, अन्यथा आंदोलन पुन्हा तीव्र करू असा इशारा दिला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Councilors' fasting against the Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.