शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून वणीत सीसीआयची कापूस खरेदी सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 18:02 IST

कापूस उत्पादकांना दिलासा : दीड हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात १३ नोव्हेंबरपासून सीसीआयची कापूस खरेदी सुरू होणार आहे, तर १८ नोव्हेंबरपासून शिंदोला उपबाजार समितीच्या आवारात कापूस खरेदीस प्रारंभ होणार आहे. नोव्हेंबरपासून सीसीआयच्या ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली असून, आतापर्यंत एक हजार ५०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. भारतीय कपास निगम (सीसीआय) मार्फत १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.

देशभरात यंदा सीसीआयच्या माध्यमातून ५०० केंद्रांवर कापूस खरेदी करण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत राज्यात १२० केंद्रे सुरू करण्यात आली असून, यातील ६१ केंद्रे विदर्भातील आहेत. ८ ते १२ टक्के ओलावा आणि लांब धागा (२९.५ ते ३०.५ मिमी) अशा दर्जाच्या कापसासाठी सात हजार ५२१ रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. धाग्याच्या लांबीनुसार (स्टेपल लेंथ) विचारात घेऊन सहा हजार ६२१ ते एक्स्ट्रॉ लॉग स्टेपल (अधिक लांबीचा धागा) साठी आठ ७२१ रुपये असा हमीदर दिला जाणार आहे. विदर्भात पश्चिम विदर्भ हा कापूस उत्पादक पट्टा आहे. दिवाळीनंतर कापसाचा हंगाम प्रारंभ झाला. मागील चार-पाच दिवसांपासून कापूस बाजारात येत आहे. सीसीआयचा कापूस जिनिंग प्रेसिंगसाठी वणीतील १२ जिनिंगधारकांच्या निविदा पास झाल्या आहेत. 

नोंदणीसाठी लागणार ही कागदपत्रे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात चालू आर्थिक वर्षाचा ऑनलाइन सातबारा उतारा व कापूस पिकपेरा तसेच बँकेला व आधार कार्डला लिंक असलेला मोबाइल क्रमांकासह आधार कार्डची सत्यप्रत घेऊन प्रत्यक्ष हजर राहून नोंदणी करून घ्यावी. सीसीआयमार्फत पिकपेयाप्रमाणे एकरी १२ क्विंटलप्रमाणे खरेदी ग्राह्य धरण्यात येणार आहे. एका दिवसात जास्तीत जास्त ४० क्विंटल कापूस खरेदी केला जाणार आहे. पिवळा पडलेला. पावसात (पाण्यात) भिजलेला कापूस खरेदी केला जाणार नाही.

"शेतीमाल विक्री करताना बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना विक्री करावा व खरेदीदाराकडून अधिकृत हिशेबपट्टी घ्यावी. जेणेकरून भविष्यात शासनाकडून शेतीमालासाठी अनुदान जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणे सुलभ होईल. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात बाजार समितीचा परवाना न घेता काही व्यापारी अनधिकृतपणे शेतीमालाची खरेदी करीत असून, असे व्यापारी निदर्शनास आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करणे सुलभ जाईल." - अशोक झाडे, सचिव, बाजार समिती, वणी

टॅग्स :cottonकापूसyavatmal-acयवतमाळAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती