शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कापसाले मारला हो बोंडअळीने डोळा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:07 IST

गावातल्या माणसाला तशी भांडवलशाही दुनिया जुमानत नाही. पण आपल्या मनात दबलेली खदखद व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या झडत्यांतून गावकऱ्यांना ही संधी मिळत असते. म्हणूनच यंदाच्या शेतीच्या अवस्थेवर बोलणाऱ्या झडत्या कास्तकारांनी तयार केल्या आहेत.

ठळक मुद्देपोळ्याच्या झडत्या : कृषिवलांच्या मनातली खदखद होणार व्यक्त

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :पोळा रे पोळाकास्तकाराचा पोळाया पोळ्यामंदीझाले अवघे गोळाकापसाले मारला होबोंडअळीने डोळाएक नमन कवडा पार्वतीहर हर महादेवऽऽऽअशा झडत्या यंदाचा पोळा दणाणून सोडण्यासाठी तयार आहेत. गावातल्या माणसाला तशी भांडवलशाही दुनिया जुमानत नाही. पण आपल्या मनात दबलेली खदखद व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या झडत्यांतून गावकऱ्यांना ही संधी मिळत असते. म्हणूनच यंदाच्या शेतीच्या अवस्थेवर बोलणाऱ्या झडत्या कास्तकारांनी तयार केल्या आहेत.पोळा दरवर्षीच येतो. दरवर्षीच झडत्याही दणाणतात. पण दरवर्षीच्या झडत्या असतात नव्या कोºया. एखाद्या साली पीक चांगलं असते, तर एखाद्या साली शेती बरबाद झालेली असते. यंदाही कापसावर बोंडअळीने हल्ला चढविलेलाच आहे. त्याचे दु:ख व्यक्त करणारी ही झडती आर्णी तालुक्यातील जवळाचे अ.भा.ठाकूर यांनी तयार ठेवली आहे. पण आपलंच दु:ख कुरवाळत बसणारा शेतकऱ्याचा स्वभाव नाही. यंदाच्या पावसाने कोल्हापूरवासीयांची जी धुळधाण उडविली, त्यावरही झडत्यांतून भाष्य होणार आहे.पाणी रे पाणीआभायातलं पाणीआलं जोरजोरात म्हणूनकोल्हापूरची धुयधाणीएक नमन कवडा पार्वतीहर हर महादेवऽऽऽपण हा उत्साह साजरा करतानाही तो सरकारच्या धोरणांवर आसूड ओढल्याशिवाय राहात नाही. यंदाही सरकारला वेसण घालणारी अशीच एक झडती गुंजणार आहे...पैसा रे पैसा सरकारचा पैसाया महागाईमंदीकास्तकार जगन बे कैसाशेतमालाले भाव देऊनफुलवा शेतकरी कमळाजैसाएक नमन कवडा पार्वतीहर हर महादेवऽऽऽयवतमाळ शहरात सौंदर्यीकरण करताना कृषिसंस्कृती जपण्यात आली. लोहारा चौकात आकर्षक भव्य असा नंदी साकारण्यात आला आहे. याच नंदीच्या मागील बाजूला कमलेश्वराचे प्राचीन मंदिर असून तेथेच शुक्रवारी पोळाही भरणार आहे. शिवाय बाजार समितीपुढेही कष्टणाऱ्या शेतकरी कुटुंबाची देखणी प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती