लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: वणी तालुक्यातील निळापूर ब्राह्मणी मार्गावर असलेल्या एका जिनिंगमधील कापसाच्या गंजीला मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्र रुप धारण केले व तीत लाखो रुपयांचा कापूस जळून भस्मसात झाला. ही आग आटोक्यात आणली असून त्यामागचे कारण गुलदस्त्यात आहे. दोन महिन्यांपूर्वीही याच जिनिंगमध्ये आग लागून लाखोंच्या कापसाची होळी झाली होती.
यवतमाळ जिल्ह्यात कापसाच्या गंजीला आग; लाखोंचा माल भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:20 IST