शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: जिवंतपणीच कोरोनाने मृत झाल्याचे घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 03:00 IST

यवतमाळ कोविड सेंटरमधील प्रकार; नातेवाईकांना मनस्ताप

निवघा बाजार (जि. नांदेड) : हदगाव तालुक्यातील मौजे बोरगाव (ध.) येथील तरुण यवतमाळ येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेताना मरण पावल्याची माहिती हदगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली. ही माहिती पोलिसांनी बोरगाव येथील तरुणाच्या नातेवाइकांना दिली. मात्र, सदर तरुण जिवंत असल्याने त्याच्या नातेवाइकांना विनाकारण मनस्ताप झाला. बोरगाव (ध.) येथील सुरेश रामदास बोंडारे  हा तरुण पोटगी न भरल्याने यवतमाळ येथील कारागृहात १५ दिवसांपूर्वी दाखल झाला होता. त्याला कोरोना झाल्याने यवतमाळ कोविड सेंटरमध्ये तो उपचार घेत होता. परंतु पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांनी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयाला सुरेश बोंडारे हा कोरोनाने मरण पावला असून, ही माहिती त्याच्या नातेवाइकांना देण्यात यावी, असे कळविले. त्यानुसार नांदेड कंट्रोल रूमवरून ही माहिती हदगाव ठाण्यात देण्यात आली. तशी नोंद स्टेशन डायरीलाही करण्यात आली.तरुण मयत झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. सुरेश यांचे नातेवाईक यवतमाळ येथे गेले असता तो जिवंत असल्याचे पाहून नातेवाइकांना आश्चर्याचा धक्काच बसला. सदर तरुण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून, तो ठणठणीत असल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. पोलीस प्रशासनाच्या चुकीमुळे आम्हाला खूप मानसिक त्रास झाल्याचे विनायकराव कदम यांनी सांगितले.