शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

coronavirus: मेडिकलमध्ये कोरोना रुग्णाच्या जेवणात सापडल्या अळ्या, गरीब, श्रीमंत असा दुजाभाव होत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 14:53 IST

शहरातील आर्णी रोड परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात शनिवारी रात्री मृत गोम निघाली. तो प्रकार पाहून त्या रुग्णालाही किळस आली. यापूर्वीसुद्धा कोरोना रुग्णांना व कोरोना संशयितांना दिल्या जाणा-या जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या होत्या.

यवतमाळ - येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची जेवणाबाबत सुरुवातीपासून तक्रार आहे. शनिवारी रात्री मेडिकलमधील गर्ल्स होस्टेलमध्ये ठेवण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात चक्क मृत गोम आढळली. यापूर्वी ६ एप्रिलला जेवणाच्या डब्यात अळ्या निघाल्या होत्या. हे निकृष्ट अन्न आरोग्यासाठी धोकादायक ठरणारे आहे. आजारातून बरे होण्याऐवजी तो आणखी वाढण्याचा धोका रुग्णांनी व्यक्त केला. शहरातील आर्णी रोड परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात शनिवारी रात्री मृत गोम निघाली. तो प्रकार पाहून त्या रुग्णालाही किळस आली. यापूर्वीसुद्धा कोरोना रुग्णांना व कोरोना संशयितांना दिल्या जाणाºया जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या होत्या. मात्र त्यानंतरही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. या प्रकाराची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. कोरोना पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांमध्येही दुजाभाव होत असल्याचा आरोप नेर येथील एका रुग्णाने केला आहे. पेट्रोलपंप मालक असलेल्या कुटुंबाला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात होती तर सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील कोरोना संशयिताकडे व रुग्णांकडे कुणीही फिरकत नसल्याचे वास्तव त्याने अभ्यागत मंडळाच्या सदस्य प्रा.डॉ.प्रवीण प्रजापती यांच्याकडे मांडले. या गंभीर प्रकाराची तत्काळ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेश सिंग यांच्याकडे तक्रारही करण्यात आली. मात्र त्यानंतरही फार काही सुधारणा झालेली नसल्याचे सांगण्यात येते. पॉझिटिव्ह आजीच्या देखभालीसाठी ठेवले नातवालाशासकीय रुग्णालयात अजब कारभार सुरू आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ८५ वर्षीय आजीच्या देखभालीसाठी चक्क कोरोना नसलेल्या नातवाला ठेवले आहे. वयोवृद्ध आजीची देखभाल करावी, तिला डोळ्याने दिसत नाही, ती चालू शकत नाही अशी विनवणी नातवाने कोरोना वॉर्डातील डॉक्टरांकडे केली होती. मात्र त्या नातवालाच तुझ्या आजीची देखभाल तुलाच करावी लागेल असे दरडावण्यात आले. आजीच्या प्रेमापोटी नातवाने चक्क कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डात थांबण्याचा निर्णय घेतला. प्रकरण अंगलट येत असताना दिसताच रुग्णालय प्रशासनाने सारवासारव करत तो नातू स्वेच्छेने कोरोना वॉर्डात राहात असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र नातवाचा नाईलाज असल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ