शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
3
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
4
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
5
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
6
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
7
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
8
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
9
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
10
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
11
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
12
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
13
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
14
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
15
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
16
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
18
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
19
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
20
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : यवतमाळमध्ये गेल्या 24 तासांत 318 नवे रुग्ण, दोन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 17:38 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 75 वर्षीय महिला आणि यवतमाळ तालुक्यातील 59 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 318 जणांमध्ये 208 पुरुष आणि 110 महिला आहेत. (CoronaVirus)

यवतमाळ- गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 318 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याच बरोबर, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आयसोलेशन वॉर्ड, विविध कोवीड केअर सेंटर्स आणि कोवीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 258 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. (CoronaVirus: 318 new cases, two deaths in Yavatmal in last 24 hours)

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 75 वर्षीय महिला आणि यवतमाळ तालुक्यातील 59 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 318 जणांमध्ये 208 पुरुष आणि 110 महिला आहेत. यात पुसद 103, यवतमाळातील 63 रुग्ण, दिग्रस 56, वणी 23, बाभुळगाव 22, आर्णि 7, दारव्हा 7, कळंब 2, महागाव 10, मारेगाव 1, नेर 3, पांढरकवडा 8, उमरखेड 8, राळेगाव 1  आणि 4 इतर रुग्ण आहेत.

मंगळवारी एकूण 1482 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 318 जण नव्याने पॉझेटिव्ह आले, तर 1164 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1930 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 19743 झाली आहे. 24 तासात 258 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 17329 आहे. तर जिल्ह्यात एकूण 484 मृत्यूची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 174998 नमुने पाठविले असून यापैकी 173327 प्राप्त तर 1671 अप्राप्त आहेत. तसेच 153384 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने सांगितले आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल