पुसद शहरामध्ये कोरोना विषाणूचे तांडव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 05:00 AM2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:00:21+5:30

रविवारी एकाच दिवशी १५ रुग्णांची भर पडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या १५ जणांच्या संपर्कातील १२० नागरिकांची त्वरित रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. सुदैवाने सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. याशिवाय १४० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी ९० जणांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठविले जाणार असल्याची माहिती आहे.

Corona virus continues to plague the city of Pusad | पुसद शहरामध्ये कोरोना विषाणूचे तांडव सुरूच

पुसद शहरामध्ये कोरोना विषाणूचे तांडव सुरूच

Next
ठळक मुद्देरविवारी १५ रुग्णांची भर : १२० नागरिकांची रॅपिड टेस्ट, १४० जण क्वारंटाईन, ५२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहर व परिसरात कोरोनाचे तांडव सुरूच आहे. एकट्या रविवारी १५ रुग्णांची भर पडली. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५२ वर पोहोचली. तर एकूण बाधितांची संख्या ७० झाली आहे. बाधितांच्या संपर्कातील १४० नागरिक क्वारंटाईन आहे.
रविवारी एकाच दिवशी १५ रुग्णांची भर पडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या १५ जणांच्या संपर्कातील १२० नागरिकांची त्वरित रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. सुदैवाने सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. याशिवाय १४० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी ९० जणांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठविले जाणार असल्याची माहिती आहे.
शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. शनिवारी उशिरा रात्री ८ जणांचे तर रविवारी ७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. रामनगरमधील १०० व पत्रे ले-आऊटमधील २८ अशा १२८ जणांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी सांगितले. तंत्रज्ञ पंकज आडे, भाऊ वाघमारे, स्वाती फुके, शिव डाखोरे आदींचे पथक ही तपासणी करीत आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने प्रशासनावरील ताणही वाढत आहे. नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे. मात्र अनेकजण अद्यापही बिनधास्त वावरताना दिसत आहे. त्यामुळे पुढील काळात कठोर उपाययोजनांची गरज आहे.

दुकाने उघडू नये
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलावे. भाजीपाला, दूध, फळे आणि किराणा दुकाने उघडण्यापूर्वी टेस्ट करण्यात यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करीत आहे. दरम्यान, २१ ते २५ जुलैपर्यंत शहरातील कापड व रेडीमेड दुकाने बंद राहणार असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय गजबी, सचिव नरेंद्र माजरा यांनी सांगितले आहे.

तिन्ही आमदार लॉकडाऊनसाठी आग्रही
आमदार इंद्रनील नाईक, आमदार अ‍ॅड.नीलय नाईक आणि आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यातून त्यांनी सात ते १० दिवसांचा कठोर लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणी केली. या पत्रावरून सात ते दहा दिवसांच्या लॉकडाऊनसंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविणार असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी सांगितले.

Web Title: Corona virus continues to plague the city of Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.