शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

कोलामपोडावरही झाली कोरोनाची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:00 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बचावासाठी सर्वत्र लोकांमध्ये जागृती केली जात आहे. जनताही आपआपल्या परीने कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर कोलाम वस्त्यांमध्ये काय स्थिती आहे, हे जाणून घेतले असता, मागास समजल्या जाणाऱ्या कोलाम वस्त्यातसुध्दा कोरोनाला हाकलून लावण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात महिलांचा पुढाकार विशेषातत्वाने दिसून आला. घराबाहेर न पडण्याच्या सरकारच्या आवाहनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या बचावासाठी गावात एकजूट, नवख्यांना गावात ‘नो एंट्री’, वेशीवर लावला फलक

देवेंद्र पोल्हे ।लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : तालुक्यातील डोंगर माथ्यावर वसलेल्या कोलामपोडावरही आता कोरोना या आजाराविषयी जनजागृती झाली आहे. पोडावर वसाहत करून राहणारे आदिवासी बांधव कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेत आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने तालुक्यातील जानकाई पोड येथे भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला, तेव्हा ही बाब पुढे आली.सध्या कोरोनाच्या आजाराने विश्व भयभीत झाले असताना कोरोनाचा आजार चीन देशाचा असून कोरोनाला गावात प्रवेश करू न देण्याचा दृढ निश्चय कोलाम महिलांनी केला आहे. संपुर्ण गावात एकजूट करून उपाययोजनेसोबतच देवदेवतांकडे साकडे घातले जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बचावासाठी सर्वत्र लोकांमध्ये जागृती केली जात आहे. जनताही आपआपल्या परीने कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर कोलाम वस्त्यांमध्ये काय स्थिती आहे, हे जाणून घेतले असता, मागास समजल्या जाणाऱ्या कोलाम वस्त्यातसुध्दा कोरोनाला हाकलून लावण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात महिलांचा पुढाकार विशेषातत्वाने दिसून आला. घराबाहेर न पडण्याच्या सरकारच्या आवाहनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. कोलाम समाजात दिवसा काम न केल्यास रात्री चूल पेटत नाही, अशी स्थिती असतानाही कोरोनाच्या मुकाबल्यासाठी या भागातील आदिवासीदेखील धीटपणे उभे राहिले आहे. मारेगाव तालुक्यात कोलाम समाजाच्या ५६ वस्त्या आहेत. अशिक्षित, मागास, विकासापासून कोसोदूर असलेला समाज म्हणून त्यांची पुढारलेल्या समाजात ओळख. कोरोनाबद्दल यांना काय माहीत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अतीदुर्गम डोंगराळ जानकाई पोड गावात घरांची संख्या ९६ असून लोकसंख्या ५०० च्या जवळपास आहे. १०० टक्के कोलाम वस्ती असलेल्या या गावात नवीन लोकांना गावात येण्यास बंदी आहे. गावाबाहेर तशा सूचना फलक लावला आहे. हे बंधन घातल्यामुळे बाहेरील कोणतीही व्यक्ती थेट गावात येऊ शकत नाही.रोजगार बुडाला तरी चालेलतानेबाई आत्राम या वृद्ध महिलेने सांगितले की, हा चीनचा आजार आहे, आम्ही तो घेणार नाही आणि या भागात येऊही देणार नाही. त्यासाठी सर्व प्रकारची काळजी आम्ही घेत आहो. मिरा टेकाम यांनी सांगितले, सरकारने हा आजार टाळण्यासाठी जास्त लोकांमध्ये न जाण्याचे व घरीच थांबण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आजार रोखण्यासाठी आम्ही सर्व सूचनांचे पालन करू, रोजगार बुडाला तरी चालेल. अशाच प्रतिक्रिया बायजाबाई आत्राम, झिबलाबाई मेश्राम, सैजाबाई आत्राम, पोतीबाई टेकाम आदींनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Socialसामाजिक