शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाची गती वाढली; २४ तासात १५२ पॉझेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 21:08 IST

गत २४ तासात यवतमाळ जिल्ह्यात नव्याने १५२ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून पाच कोरानाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला.

ठळक मुद्देपाच मृत्यू ; ४२ जणांना सुट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत २४ तासात जिल्ह्यात नव्याने १५२ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून पाच कोरानाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 42 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मृत झालेल्या पाच जणांमध्ये यवतमाळ शहरातील 53 वर्षीय व 60 वर्षीय अशा दोन महिला, आर्णी शहरातील 67 वर्षीय पुरूष, पांढरकवडा तालुक्यातील 42 वर्षीय महिला व 24 वर्षीय पुरुष आहे. तसेच गत 24 तासात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 152 जणांमध्ये 88 पुरुष व 64 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 32 पुरुष व 18 महिला, वणी शहरातील सहा पुरुष व तीन महिला, उमरखेड शहरातील चार पुरूष व तीन महिला, उमरखेड तालुक्यातील एक पुरूष व एक महिला, पुसद शहरातील दोन पुरुष व तीन महिला, पांढरकवडा शहरातील सहा पुरुष व एक महिला, नेर शहरातील पाच पुरुष व तीन महिला, कळंब शहरातील एक पुरूष व चार महिला, घाटंजी शहरातील दोन महिला व तालुक्यातील दोन महिला, दिग्रस शहरातील 20 पुरुष व 15 महिला, दारव्हा शहरातील दोन पुरूष, दारव्हा तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील चार पुरूष व तीन महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरूष, आर्णी शहरातील दोन पुरूष व पाच महिला पॉझेटिव्ह आले आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 960 ?क्टीव्ह पॉझेटिव्ह असून होम आयसोलेशनमध्ये 277 जण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 4544 झाली आहे. यापैकी 3182 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 124 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 234 जण भरती आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 201 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 57322 नमुने पाठविले असून यापैकी 53933 प्राप्त तर 3389 अप्राप्त आहेत. तसेच 49389 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस