पुसद तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:00:02+5:30

गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ३६३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. यात ग्रामीण भागातील ५९ तर शहरी भागातील ३०४ नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत २२५ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र तालुक्यात कोरोनाने १२ जणांचे बळी घेतले आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे.

Corona outbreak continues in Pusad taluka | पुसद तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच

पुसद तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच

Next
ठळक मुद्दे१२८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह : एकूण बाधितांचा आकडा ३६३, ग्रामीणमध्ये शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. बुधवारी तब्बल ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२८ वर पोहोचली आहे.
गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ३६३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. यात ग्रामीण भागातील ५९ तर शहरी भागातील ३०४ नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत २२५ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र तालुक्यात कोरोनाने १२ जणांचे बळी घेतले आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. यामुळे शहर व ग्रामीण भागात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.
तालुक्यातील हुडी येथील चार, निंबी पाच, मधुकरनगर सात, जांबबाजार पाच, धुंदी (तांडा) एक, चोंढी दोन, श्रीरामपूर पाच, गोविंदनगर तीन, वरूड चार, भंडारी एक, पार्डी नऊ, द्वारकानगरी दोन, आडगाव एक, हिवळणी दोन, बालाजी पार्क तीन, इसापूर एक आणि पिंपळगाव (ई) येथील एका नागरिकाला आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. चोंढी व श्रीरामपूर येथील प्रत्येकी एक महिला व इसापूर धरण येथील एका अशा तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ग्रामीण भागात सध्या २३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. ३३ जणांनी कोरोनावर मात केल्याचे गटविकास अधिकारी शिवाजी गवई यांनी सांगितले.
पुसद शहरात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ३०४ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. सध्या शहरात १०५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. शहरातील नऊ जणांचे आतापर्यंत बळी गेले आहे. तर १९२ जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली.
दिवसेंदिवस शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या काही दिवसात दररोज २५ च्यावर अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू आहे. येथील आयुर्वेदिक रुग्णालय व आसारपेंड येथील कोविड सेंटरमध्ये रुग्ण व संयशितांवर उपचार केले जात आहे. मात्र कोरोनाची साखळी अद्यापही तुटली नाही. त्यामुळे काळजी व्यक्त होत आहे.

प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची गरज
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अनेक नागरिक बिनधास्त वागत आहे. कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरिभाऊ फुपाटे, मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड, बीडीओ शिवाजी गवई आदी कोरोनावर मात करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

Web Title: Corona outbreak continues in Pusad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.