शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:00 IST

खासगी कोविड रुग्णालयांमध्ये गेल्या वर्षभरापासून डाॅक्टरांनी उपचार करून अनुभव घेतलेल्या औषधांचाच तुटवडा भासत आहे. पर्यायी औषधी फारशी प्रभावी ठरत नाही. कोरोना संसर्ग एका पातळीपर्यंत असताना, रुग्णाला तातडीने रेमडेसिविर इंजेक्शन दिल्यानंतर संसर्ग फैलावण्यापासून थांबतो. हा त्याचा आजपर्यंतच्या वापरातून आलेला अनुभव आहे. म्हणूनच रुग्ण डाॅक्टरांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यासाठी आग्रह धरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरुग्णांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला : डाॅक्टरांपुढेही निर्माण होतो पेच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार ७५८ सक्रिय रुग्ण आहेत. दरदिवसाला हजार नव्या रुग्णांची भर  पडत आहे. त्या तुलनेत औषधी व इंजेक्शन उपलब्ध नाहीत. खासगी डाॅक्टरांना मर्यादित औषधांचा वापर करून उपचार करावा लागत आहे. यामुळे रुग्णाला आजारातून बाहेर येण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा अवधी लागत आहे. परिणामी नव्या रुग्णांना बेडस्‌ उपलब्ध होत नाहीत. वेळेत उपचार न मिळाल्याने त्या रुग्णांची प्रकृती अधिक खालावत आहे. ही गंभीर स्थिती गेल्या आठवडाभरापासून निर्माण झाली.खासगी कोविड रुग्णालयांमध्ये गेल्या वर्षभरापासून डाॅक्टरांनी उपचार करून अनुभव घेतलेल्या औषधांचाच तुटवडा भासत आहे. पर्यायी औषधी फारशी प्रभावी ठरत नाही. कोरोना संसर्ग एका पातळीपर्यंत असताना, रुग्णाला तातडीने रेमडेसिविर इंजेक्शन दिल्यानंतर संसर्ग फैलावण्यापासून थांबतो. हा त्याचा आजपर्यंतच्या वापरातून आलेला अनुभव आहे. म्हणूनच रुग्ण डाॅक्टरांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यासाठी आग्रह धरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे. मागणीच्या अर्धाही पुरवठा होत नाही. इतकेच काय, ४० हजार रुपये किमतीच्या ‘टाॅसिलीझूमॅप’ या इंजेक्शनचाही तुटवडा भासत आहे. फेव्हिपिरॅव्हीर ही गोळीसुद्धा उपलब्ध नाही. परिणामकारक औषधी नसताना उपचार करायचा कसा? असा प्रश्न डाॅक्टरांकडून उपस्थित केला जात आहे. रुग्णांचे नातेवाईक औषधी मिळविण्यासाठी सैरभैर फिरत आहेत. अतिरिक्त रक्कम मोजूनही औषधी मिळणे कठीण झाले आहे. ऑक्सिजनचा तंतोतंत वापर कोरोना रुग्णाला पूर्वी पूर्णक्षमतेने ऑक्सिजन दिला जात होता. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन पुरवठासुद्धा मर्यादित झाला आहे. त्यामुळे रुग्णांंना तंतोतंत ऑक्सिजन द्यावा लागत आहे. याचाही परिणाम रुग्ण बरे होण्यावर होत आहे.  त्यातूनच रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढून मृत्यूदर दरदिवसाला वाढत आहे.  

 रेमडेसिविर, फेव्हिपिरॅव्हीर, टाॅसिलीझूमॅपसाठी भटकंतीगेल्या वर्षभरापासून कोरोना रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी औषधाचा प्रोटोकाॅल ठरविला आहे. त्याला सुरुवातीला डब्ल्यू  एचओनेही मान्यता दिली होती. त्याच आधारावर या औषधांचा कोरोना रुग्णांवर वापर केला. त्याचे चांगले परिणामही मिळाले. आता याच औषधी बाजारात उपलब्ध नाहीत. जिल्ह्यात याची टंचाई निर्माण झाली आहे. मागणीच्या केवळ पाच टक्के पुरवठा होत असल्याने डाॅक्टरांना पर्यायी औषधी कोणती द्यावी, असा पेच पडला आहे. परिणामी रुग्णांना जास्त दिवस लागत आहे. 

गोळ्यांच्या ६०० स्ट्रीप, तर इंजेक्शनचे २०० व्हायल प्राप्त झाले आहे. ऑक्सिजनसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ऑक्सिजन साठवण क्षमता नसल्याने काठोकाठ नियोजन आहे. भिलाईवरून ऑक्सिजन आणण्याचे प्रयत्न आहेत.  - डाॅ. सविता दातीरऔषधी निरीक्षक, यवतमाळ 

जिल्ह्याला आवश्यक औषधी पाच दिवसांत उपलब्ध होणार आहे. डब्ल्यू  एचओच्या निर्देशाप्रमाणे उपचार करणे अपेक्षित आहे. कोरोनासाठी उपचाराचा प्रोटोकाॅल ठरलेला आहे. तो डाॅक्टरांनी पाळावा.  स्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहे.              - अमोल येडगेजिल्हाधिकारी, यवतमाळ. 

औषध, ऑक्सिजनच्या मर्यादित साठ्यामुळे रुग्णांवर गरजेनुसार वापर करावा लागत आहे. प्रत्येकाला योग्य डोस न मिळाल्याने रुग्णाला जास्त दिवस उपचारार्थ ठेवावे लागत आहे. याचा परिणाम नव्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. पर्यायी औषधी फारशी परिणामकारक नाही.  - डाॅ.महेश शहाखासगी कोविड रुग्णालय संचालक

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस