लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी नगरपरिषदेचा आरोग्य विभाग सरसावला आहे. शहर स्वच्छतेसाठी सर्व प्रभागात नाल्यांची सफाई व निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत सफाई कामगार कोरोना योद्धा बनले आहे.आमदार इंद्रनील नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार अॅड. नीलय नाईक, नगराध्यक्ष अनिताताई नाईक, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, उपाध्यक्ष डॉ. अकील मेमन, आरोग्य सभापती राजेश साळुंके, आरोग्य निरीक्षक सुभाष राठोड आदींच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागातील १६९ सफाई कामगार, खासगी कंत्राटदाराच्या नेतृत्वातील ५० कर्मचारी सर्व १४ प्रभागातील २९ वार्डात नाल्या सफाई व निर्जंतुकीकरण फवारणी करीत आहे.सर्व प्रमुख रस्त्यांसह वार्डावार्डात वर्दळीच्या ठिकाणी युपीएल कंपनीच्या प्रगत ‘शक्तीमान’ फवारणी यंत्राद्वारे केली जात आहे. सोबतच अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख किरण आत्राम यांच्या नेतृत्वात १८ ते २० कर्मचारी दररोज एकेका वार्डात हातपंपाद्वारे फवारणी करीत आहे. प्रभाग क्र. ८ ते १४ मध्ये आरोग्य विभागाने खासगी कंत्राटदाराच्या ५० कामगारांच्या माध्यमातून सांडपाण्याच्या नाल्यांची सफाई करीत आहे.पुसद नगरपरिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत १६९ सफाई कामगार आहेत. त्यापैकी ७३ महिला कर्मचारी वार्डात जाऊन झाडझूड करतात. तर ९६ कर्मचारी ट्रॅक्टर, घंटागाडी चालवून वार्डातील कचरा उचलतात. उर्वरित २० कर्मचारी फवारणीचे काम करीत जणू कोरोना योद्धा झाले आहे, अशी माहिती आरोग्य निरीक्षक सुभाष राठोड यांनी दिली.नागरिकांनी सहकार्य करावेया संकटसमयी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष अनिताताई मनोहरराव नाईक यांनी केले आहे. पुसद नगरपरिषद आरोग्य विभाग कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. शहरातील सर्व १४ प्रभागात नाल्या सफाई व निर्जंतुकीकरण फवारणीचे काम प्रगतीपथावर आहे. विरोधक खोडसाळपणे तक्रारी करीत असून आरोग्य विभाग कोणताही भेदभाव करीत नसल्याची प्रतिक्रिया आरोग्य सभापती राजेश साळुंके यांनी दिली.
पुसदमध्ये सफाई कामगार झाले कोरोना योद्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST
आमदार इंद्रनील नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार अॅड. नीलय नाईक, नगराध्यक्ष अनिताताई नाईक, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, उपाध्यक्ष डॉ. अकील मेमन, आरोग्य सभापती राजेश साळुंके, आरोग्य निरीक्षक सुभाष राठोड आदींच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागातील १६९ सफाई कामगार, खासगी कंत्राटदाराच्या नेतृत्वातील ५० कर्मचारी सर्व १४ प्रभागातील २९ वार्डात नाल्या सफाई व निर्जंतुकीकरण फवारणी करीत आहे.
पुसदमध्ये सफाई कामगार झाले कोरोना योद्धा
ठळक मुद्देनगरपालिका आरोग्य विभागाचा पुढाकार : प्रतिबंधासाठी शहरात उपाययोजना