शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

नियंत्रण कक्षात तब्बल पाऊणशे पोलिसांची फौज

By admin | Updated: December 30, 2014 23:44 IST

पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांच्या तपासाला, मोर्चे-आंदोलनाच्या बंदोबस्ताला आणि रात्रगस्तीला अधिकारी-कर्मचारी नाहीत. तर दुसरीकडे नियंत्रण कक्षात तब्बल डझनभर अधिकारी आणि पाच डझन

११ अधिकारी-६० कर्मचारी : पोलीस ठाण्यांमध्ये मात्र वाणवा यवतमाळ : पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांच्या तपासाला, मोर्चे-आंदोलनाच्या बंदोबस्ताला आणि रात्रगस्तीला अधिकारी-कर्मचारी नाहीत. तर दुसरीकडे नियंत्रण कक्षात तब्बल डझनभर अधिकारी आणि पाच डझन कर्मचाऱ्यांची भाऊगर्दी झाली आहे. पोलीस दलाच्या या विसंगत स्थितीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षात सध्या तीन पोलीस निरीक्षक, चार सहायक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक आणि तब्बल ६० कर्मचारी तैनात आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने नियंत्रण कक्षात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची गर्दी करण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. वास्तविक नियंत्रण कक्षात चार ते पाच कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु प्रत्यक्षात तेथे पाऊणशे कर्मचारी तैनात केले गेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी असल्याने त्यांना बसायला खुर्च्या आणि हाताला कामही नाही. नियंत्रण कक्षात तैनाती असलेले हे कर्मचारी बसण्यासाठी इतरत्र जागा शोधताना दिसतात. कुठेच जागा मिळाली नाही तर तासन्तास टपरीवर घालवतात. नियंत्रण कक्षातील ड्युटीला हे अधिकारी-कर्मचारी त्रासले आहेत. आम्हाला काही तरी काम द्या हो, असा टाहो ते फोडत आहेत. कोणत्याही कामाशिवाय दरमहा पगार घेणे यातील अनेकांना रुचणारे नाही. जिल्ह्यात २९ पोलीस ठाणे, पाच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, कर्मचारी कल्याण शाखा, महिला कक्ष आदी विभाग आहेत. मात्र तेथे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. अनेक पोलीस ठाण्यांमध्येसुद्धा पुरेसे मनुष्यबळ नसल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. रखडलेले तपास, डिटेक्शनचे घटलेले प्रमाण, गस्त न घालणे, वाढती गुन्हेगारी यासाठी पुरेशा मनुष्यबळाचा अभाव हे प्रमुख कारणे सांगितले जाते. तर दुसरीकडे मनुष्यबळाबाबत असमतोल निर्माण झाल्याचे चित्र आहे. पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. तर नियंत्रण कक्षात कोणत्याही कामाशिवाय ११ पोलीस अधिकारी आणि ६० कर्मचारी अडवून ठेवण्यात आले आहे. गृह पोलीस उपअधीक्षकाच्या या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)